दिल्‍लीत निर्दयीपणाचा कडेलोट… कारने तरुणीला चिरडल्‍यानंतर चार किलोमीटर फरफटत नेले | पुढारी

दिल्‍लीत निर्दयीपणाचा कडेलोट... कारने तरुणीला चिरडल्‍यानंतर चार किलोमीटर फरफटत नेले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत एक धक्‍कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर (Delhi Accident) आली आहे. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना कार दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर दुचाकीवरील तरुणीला कारने तब्‍बल चार किलोमीटर फरफटत नेले. हा अपघातात इतका भीषण होता की, तरुणीच्या शरीराचे काही अवयव तुटून रस्त्यावर पडले. ही घटना शनिवारी (दि.३१) रात्री तीन वाजता सुलतानपूर ते कांजवाला परिसरात घडली. या प्रकरणी कारमधील पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.

डीसीपी हरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्‍यरात्री एक तरुणी विविस्‍त्र अवस्‍थेत रस्त्यावर पडली असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात (Delhi Accident) पडल्याचे दिसले.

कारमधील पाच तरुण  नवीन वर्ष साजरे करण्‍याच्‍या नादात बेधूंद अवस्‍थेत बेदरकारपणे कारने जात होते.  २३ वर्षीय तरुणी आपल्या स्कूटीवरून घरी जात होती. स्कूटी आणि कारची समोरासमोर धडक झाली. यानंतर बेधूंदपण कार चालविणार्‍या कार चालकाने तरुणीला सुलतानपूर ते कांजवाला परिसरात चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. तरुणीच्‍या मृतदेहाचे काही अवयव तुटले होते. तिचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडला होता.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यापैकी राजेश खन्ना (वय २६) ग्रामीण सेवेत चालक पदावर काम करत आहे. राजकुमार खन्ना (वय २५) उत्तम नगरमध्ये एसबीआय कार्डसाठी काम करत आहे. काशीनाथ सीपी (वय २७) नवी दिल्लीतील स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये काम करत आहे. शिवकुमार नरैना (वय २६) हेअर ड्रेसर आहे. सुरेंद्र मित्तल (वय २७) हा पी ब्लॉक सुलतानपुरी येथे रेशन विक्रेता आहे. आरोपींना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू असल्‍याचेही हरेंद्र सिंह म्‍हणाले.

हेही वाचा :  

Back to top button