उत्तर कोरिया निश्चितच अणु चाचणी करत आहे. पाकिस्तान चाचणी करत आहे. ते तुम्हाला त्याबद्दल सांगत नाहीत. ते भूमिगत चाचणी करतात. तुम्हाला फक्त थोडे कंपन जाणवते. लोकांना काय चालले आहे हे माहित नसते, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
Donald Trump Pakistan nuclear tests
अमेरिकेने तीन दशकांहून अधिक काळ अणु चाचण्या करण्यापासून परावृत्त केले असले तरी, पाकिस्तानसह अनेक देश जागतिक तपासणीपासून दूर भूमिगत अणुचाचण्या करत आहेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी रविवारी (दि. २) सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत केला. रशिया, चीन आणि उत्तर कोरियासह अन्य देशांनी अणुचाचण्या सुरु ठेवल्यास अमेरिका स्वतःचे अणुचाचण्या पुन्हा सुरू करेल, असा इशाराही त्यांनी दिला. आता पाकिस्तानवर अणुचाचण्या सुरु केल्याचा आरोप करणारे ट्रम्प हे पहिले अमेरिकेचे अध्यक्ष ठरले आहेत.
या वेळी ट्रम्प म्हणाले की, उत्तर कोरिया निश्चितच अणु चाचणी करत आहे. पाकिस्तान चाचणी करत आहे. ते तुम्हाला त्याबद्दल सांगत नाहीत. ते भूमिगत चाचणी करतात. तुम्हाला फक्त थोडे कंपन जाणवते. लोकांना काय चालले आहे हे माहित नसते. रशिया आणि चीनसारखे इतर देश देखील सार्वजनिक चर्चा टाळून गुप्तपणे चाचण्या करत आहेत. आम्ही एक मुक्त समाज आहोत. आम्ही त्याबद्दल बोलतो. त्यांच्याकडे असे पत्रकार नाहीत जे त्याबद्दल लिहितील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेत मागील ३० वर्षांपासून अणुचाचणीला स्थगिती आहे. मात्र आता आम्ही चाचणी न करणारा एकमेव देश होऊ इच्छित नाही, असे स्पष्ट करत त्यांनी अणुचाचणीचे समर्थन केले. "रशियाची चाचणी आणि चीनची चाचणी. इतर देश चाचणी करत आहेत. आम्ही एकमेव देश आहोत जो चाचणी करत नाही;पण आता चाचणी न करणारा एकमेव देश होऊ इच्छित नाही, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी अणुचाचणीचे समर्थनही केले.
या मुलाखतीत ट्रम्पने दावा केला की, अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त अणु शस्त्रे आहेत. आमच्याकडे १५० वेळा जग उडवून देण्यासाठी पुरेशी अणुशस्त्रे आहेत. तसेच रशियाकडेआणि चीनकडेही खूप अण्वस्त्रे आहेत. दरम्यान, यापूर्वी गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, अमेरिकेतील अणुचाचण्या तात्काळ पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
भारत- पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होते; अतिरिक्त व्यापार कराचा इशारा देत दोन्ही देशांमधील तणाव कमी केला. दोन्ही देशांचे अमेरिकेबरोबर मोठा आर्थिक व्यवहार आहे. त्यामळे त्यांनी युद्ध थांबवले, असा पुन्नरुच्चारही ट्रम्प यांनी केला.