डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्‍या गोळीबारप्रकरणी 'एफबीआय'ने मोठा खुलासा केला आहे. FIle photo
आंतरराष्ट्रीय

ट्रम्‍प यांच्‍यावरील गोळीबार प्रकरणी FBI चा मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी ( दि.१५) पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. या हल्‍ल्‍याबाबत अमेरिकेतील गुप्‍तचर संस्‍था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)ने मोठा खुलासा केला आहे.

तरुणाने एकट्याने हल्‍ला केला

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍यावर झालेला हल्‍ला हा 'देशांतर्गत' दहशतवादातून झालेला प्रकार आहे. यामागे कोणतीही दहशतवादी संघटना किंवा टोळी नाही. तरुणाने एकट्याने हा हल्‍ला केला असल्‍याचा संशय एफबीआयने व्‍यक्‍त केल्‍याचे वृत्त 'न्‍यू याॅर्क पाेस्‍ट'ने दिले आहे.

रविवारी २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू क्रूक्सने पेनसिल्व्हेनियामध्ये निवडणूक सभेत ट्रम्‍प भाषण करत असताना त्‍यांच्‍यावर यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. ट्रम्‍प या प्राणघातक हल्‍ल्‍यातून थोडक्‍यात बचावले. त्‍यांच्‍या उजव्या कानाला दुखापत झाली. या हल्‍ल्‍यामागील ठोस कारण अद्याप एफबीआयला स्‍पष्‍ट झालेले नाही हल्ल्यामागील हेतू निश्चित करण्यासाठी दहशतवादविरोधी आणि गुन्हेगारी तपास संस्था एकत्र काम करत आहेत.

सध्‍या तरी थॉमस मॅथ्यू याने एकट्यानेच हा हल्‍ला केल्‍याचेचे दिसून येते आहे. परंतु आमच्याकडे अजून तपास व्हायचा आहे. या प्रकरणी माजी राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या हत्येचा प्रयत्न म्हणून आणि संभाव्य देशांतर्गत दहशतवाद कायदा म्हणून आम्‍ही तपास करत असल्‍याचे एफबीआयच्‍या अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

प्राथमिक तपासणीत आढळले आहे की, हल्‍लेखोराने AR- 56 रायफल कायदेशीररित्या खरेदी केली गेली होती. संशयिताच्या वाहनात संशयास्पद उपकरण देखील सापडले आहेत.

राष्‍ट्राध्‍यक्ष बायडेन यांनी पुन्‍हा एकदा राष्‍ट्राला संबोधले

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्‍या हल्‍लाप्रकरणी राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी पुन्‍हा एकदा देशवासियांना विशेष संदेश दिला आहे.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बायडेन यांनी म्‍हटलं आहे की, अशा संकट प्रसंगी मी अमेरिकेतील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. सुदैवाने ट्रम्प यांना गोळी लागली नाही आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. राजकारणातील वाढेल्‍या व्‍देषाबद्दल मला बोलायचे आहे. राजकारणात विचारधार वेगळी असली तरी आम्ही शत्रू नाही, आम्ही शेजारी आहोत, मित्र आहोत, सहकारी आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही अमेरिकन आहोत.

सुदैवाने ट्रम्पची गोळी चुकली आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. आपण सर्वांनी एक पाऊल मागे घ्यावे, आपण कुठे आहोत आणि येथून पुढे कसे जायचे याचा आढावा घ्यावा.आज संकटप्रसंगी आपण एकत्र उभे राहणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्‍यांनी अमेरिकन नागरिकांना केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT