ट्रम्‍प यांच्‍यावर गोळीबार : हल्‍लखोर होता तरी कोण?

'एफबीआय'चा हल्लेखोराबाबत मोठा खुलासा
Donald Trump Attack
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी (दि. १४) त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ट्रम्प यांच्यावर हल्ला करणार्‍या तरुणाविषयी जाणून घेवूया.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी (दि. १४) त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. गाेळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. त्‍यांना थोडी दुखापत झाली.दरम्यान, या हल्ल्याचा तपास करत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) हल्लेखोराच्या ओळखीबाबत मोठा खुलासा केला आहे.

ट्रम्प यांच्‍यावर हल्ला करणारा तरुण काेण हाेता?

  • डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा २० वर्षीय तरुण हाेता.

  • थॉमस मॅथ्यू असे त्‍याचे नाव आहे.

  • गोळीबारानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला ठार केले. 

Thomas Mathew
ट्रम्प यांचा हल्लेखोर आहे तरी कोण? Social Media

ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा थॉमस मॅथ्यूज कोण आहे?

रिपाेर्टनुसार, थॉमस मॅथ्यूज हा पेनसिल्व्हेनियामधील बेथेल पार्कचा रहिवासी आहे.ट्रम्प प्रचार करत होते त्या ठिकाणापासून जवळ असलेला एक प्लॅट त्‍याने घेतला. येथूनच त्‍याने गाेळीबार केला. सुरक्षा रक्षकांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात ताे ठार झाला. तपासादरम्यान हल्ल्याच्या ठिकाणाहून एक रायफलही जप्त करण्यात आली आहे.

Donald Trump Attack
ट्रम्प यांच्यावर हल्लाPudhari Photo

हल्ला का केला? 'एफबीआय'चा तपास सुरु

'एफबीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुण ट्रम्प यांच्या समारंभाच्या ठिकाणापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेथेल पार्क नावाच्या ठिकाणी राहत होता. मात्र, त्यांनी ट्रम्प यांच्यावर हल्ला का केला, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोळीबारात जखमी झालेला व्यक्ती हल्लेखोराशी संबधित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news