Earthquake 
आंतरराष्ट्रीय

Tibet Earthquake : तिबेटमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 7.0 तीव्रतेची नोंद

भूकंपाचे केंद्रबिंदू १७३ किमी खोलीवर

पुढारी वृत्तसेवा

Tibet Earthquake : तिबेटमध्ये गुरुवारी रात्री ८:०३ वाजताच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुमारास ७.० रिश्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली १७३ किलोमीटर खोलीवर होते.दरम्यान, चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने (CENC) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तिबेटमधील नागकू (Nagqu) जिल्ह्यात स्थानिक वेळेनुसार रात्री १०:३३ वाजता भूकंपाचा धक्का बसला. CENC च्या नोंदीनुसार भूकंपाची खोली जमिनीखाली १० किलोमीटर होती.

नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेने चिंता वाढवली

विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वीच या भागात प्राणघातक ढगफुटी आणि महापूर आला होता. त्यानंतर आता झालेल्या या तीव्र भूकंपामुळे संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात नैसर्गिक आपत्तींबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी झालेल्या या भूकंपातील जीवित अथवा वित्तहानीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नेपाळ-तिबेट सीमेजवळ २६ ऑगस्ट रोजी आला होता विनाशकारी महापूर

यापूर्वी, २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडकांचा प्रचंड कडा कोसळल्याने (Ice-rock avalanche) विनाशकारी महापूर आला होता. या महापुरात अनेक घरे, रस्ते आणि पूल वाहून गेले होते, तसेच जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले होते आणि हजारो नागरिक लापता झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT