Bondi Beach Shooting pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Bondi Beach Shooting: जीवाची बाजी लावणारा, दहशतवाद्याच्या हातून बंदूक काढून घेणारा अन् दोन गोळ्याही खाणारा 'तो' फळ विक्राता कोण?

दहशतवादी हल्ला सुरू असताना एका मध्यम वयाचा व्यक्ती बंदुकधारी दहशतवाद्यावर झडप घालतो अन् त्याच्या हातून बंदूक काढून घेतानाचा व्हिडिओ सध्या जगभरात तुफान व्हायरल होत आहे.

Anirudha Sankpal

  • कोण आहे तो धाडसी व्यक्ती

  • अहमद यांच्यावर झाली शस्त्रक्रिया

  • काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

  • नेत्यान्याहूंनी ऑस्ट्रेलिया सरकारला धरलं जबाबदार

Sydney Bondi Beach Shooting: रविवारी ऑस्ट्रेलियातील सिड्नी येथील बोंडी बीच इथं ज्यू धर्मीय हानुका हा त्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. यावेळीच दोन बंदुकधाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबारात आतापर्यंत १५ जण ठार झाले असून ४० लोक जखमी देखील असल्याचं कळतंय.

दरम्यान, हा दहशतवादी हल्ला सुरू असताना एका मध्यम वयाचा व्यक्ती बंदुकधारी दहशतवाद्यावर झडप घालतो अन् त्याच्या हातून बंदूक काढून घेतानाचा व्हिडिओ सध्या जगभरात तुफान व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी देखील या व्यक्तीला हिरो म्हणत त्याच्या धाडसाला अन् शौऱ्याला सलाम केला.

दरम्यान हा मध्यम वयाचा, सर्वसाधारण व्यक्ती ज्याला बंदूक कशी चालवायची याची जरा देखील कल्पना नसला अन् सर्व लोक सैरभैर होऊन पळत असताना दहशतवाद्याच्या हातून बंदूक हिसकावून घेणारा व्यक्ती कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे तो धाडसी व्यक्ती

दरम्यान, स्थानिक वृत्तसंस्था ७ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती ४३ वर्षाचा असून त्याचं नाव अहमद अल अहमद आहे. तो फळ विक्रेता असून त्याला हे धाडसी कृत्य करत असताना दोन गोळ्या देखील लागल्या आहेत.

७ न्यूजशी बोलाताना या अहमद अल अहमदचा चुलत भाऊ मुस्तफाने सांगितले की, 'अहमद हा सध्या रूग्णालयात असून तिथं आत काय चाललं आहे ते काही कळत नाहीये. आम्हाला आशा आहे की तो ठीक असेल. नक्कीच तो शंभर टक्के हिरो आहे.'

अहमद यांच्यावर झाली शस्त्रक्रिया

गेल्या रात्री अहमदवर शस्त्रक्रिया झाली असून मिळालेल्या माहितीनुसार त्याला बंदुक चालवण्याचा कोणताच अनुभव नव्हता. तो त्या भागातून जात असताना हा सगळा प्रकार घडला. त्यावेळी त्यानं त्या बंदुकधारी दहशतवाद्यावर झडप घालण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बान्से यांनी देखील धाडसी कृत्य करणाऱ्या अहमदला हिरो असं संबोधलं आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. त्यातील एक दहशतवादी ठार झाला असून दुसरा पोलीस कारवाईत गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे हल्लेखोर पिता - पुत्र असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या गाडीजवळ स्फोटके देखील आढळून आली असून पोलिसांनी ती घटनास्थळावरून हटवली आहेत.

काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बान्से यांनी, 'समुद्र किनारी हाकुना उत्सव साजरा करत असताना दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी ऑस्ट्रेलियन ज्यू लोकांना हाकुनाच्या पहिल्याच दिवशी टार्गेट केलं. हा आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी हे राक्षसी कृत्य करण्यात आलं. हे ज्यू विरोधी, दहशतवादी कृत्य असून हा देशाच्या ह्रदयावर घाला आहे.'

ते पुढे म्हणाले, 'ऑस्ट्रेलियन ज्यूवर हल्ला म्हणजे हा प्रत्येक ऑस्ट्रेलियन नागरिकावरील हल्ला आहे. आपल्या देशात द्वेश, हिंसाचार अन् दहशतवाद याला थारा नाही. आम्ही यांना नेस्तनाभूत करू.'

नेत्यान्याहूंनी ऑस्ट्रेलिया सरकारला धरलं जबाबदार

दरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या दहशतवादी हल्ल्याला ऑस्ट्रेलियातील सरकारच्या धोरणांना जबाबदार धरलं आहे.

ते म्हणाले, 'तीन महिन्यांपूर्वी मी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना तुमची धोरणे ही ज्यू विरोधी तत्वांना खतपाणी घालत आहेत. त्यांनी हे पत्र ज्यावेळी अँटोनी अल्बान्से यांनी कॅनबेरा इथून पॅलेस्टाईनला आम्ही देशाचा दर्जा देत आहोत अशी घोषणा केली होती त्यावेळी लिहिलं होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT