

Australia Bondi Beach shooting
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध बॉन्डी बीचवर आज (१४) सशस्त्र हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करत सामूहिक हत्याकांड घडवले. या घटनेत हल्लेखोरासह 12 जण ठार झाले असून, सुमारे १८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. अनेक राउंड गोळ्या झाडल्या गेल्याने बीचवर उपस्थित लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
सिडनी मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या गोळीबारात शूटरसह दहा लोक मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यू समुदायाचे लोक सण 'हनुक्का' साजरा करण्यासाठी शेकडो लोक बॉन्डी बीचवर जमले होते. याच दरम्यान, हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी एक नावीद अक्रम होता, तो सिडनीच्या नैऋत्येकडील बोनीरिग येथील रहिवासी होता. पोलिस सध्या गोळीबार करणाऱ्याच्या घरावर छापा टाकत आहेत. न्यू साउथ वेल्स (NSW) पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले की, पोलिसांचा तपास सुरू आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी या परिसरापासून दूर राहावे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अधिक माहिती मिळाल्यावर पुढील अपडेट देण्यात येईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस फुटपाथ पुलावर पीडितांना सीपीआर (CPR) देताना दिसत आहेत आणि गोळीबाराचे आवाज ऐकून अनेक लोक परिसरातून पळून जाताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक नागरिक हल्लेखोराला विरोध करताना दिसतो, तर पोलीस सशस्त्र हल्लेखोरांना ताब्यात घेताना दिसत आहेत. 'गार्डियन'च्या वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये काळ्या कपड्यांमधील दोन लोक बीचजवळील एका पुलाजवळ गोळीबार करताना दिसले. सुमारे एक डझन गोळ्यांचे आवाज ऐकू आले आणि लोक ओरडत सैरावैरा धावू लागले.
न्यू साउथ वेल्स पोलिसांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, बॉन्डी बीचवर पोलिसांनी दोन लोकांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिसांचे अभियान अजूनही सुरू आहे आणि लोकांना या भागापासून दूर राहण्याचे सतत आवाहन केले जात आहे. पोलिसांनी लोकांना सर्व सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे आणि पोलिसांनी लावलेली कोणतीही नाकेबंदी (घेरा-बंदी) ओलांडू नये, अशी ताकीद दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी हे देखील स्पष्ट केले आहे की डोवर हाइट्स (Dover Heights) मध्ये कोणत्याही प्रकारच्या घटनेची माहिती नाही. पोलिसांनी लोकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या घटनेचे वर्णन "धक्कादायक आणि मन विचलित करणारे" असे केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारांबरोबर चर्चा केल्याची पुष्टी केली आणि नागरिकांना पोलिसांच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियन ज्यू एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सह-मुख्य कार्यकारी ऍलेक्स रिवचिन यांनी हा हल्ला 'हनुका' उत्सवादरम्यान झाल्याची पुष्टी केली आहे.