Strait of Hormuz Ownership History Iran US Conflict: इराणपासून जवळच एक छोटा चिंचोळा सुमद्री मार्ग जातो. ही नैसर्गिक भूरचना असून तिला होर्मुझ सामुद्रधुनी म्हटलं जातं. सध्याच्या घडीला जगातिक बाजारपेठेसाठी होर्मुझ अत्यंत महत्वाची आणि संवेदनशील झाली आहे. याच भागातून मोठमोठे मालवाहू जहाज प्रवास करतात. तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी हा समुद्रीमार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातो.
इराण-अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धामुळं या जलवाहतूक करणाऱ्या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. इराणने हा जलमार्ग बंद केला असून यावर टोल लावण्याची भाषा केली आहे. यामुळं इराण-अमेरिका युद्धाची दिशाच बदलली आहे. अमेरिकेने इराणला सामुद्रधुनी ४८ तासात खुली करण्याची धमकी दिली आहे. जर होर्मुझ रस्ता खुला केला नाही तर याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
जो होर्मुझ भाग हा आज युद्धाचे एक कारण झाला आहे तिथं कोण रहात होतं. त्याचे मूळ निवासी कोण आहेत. आता ते कुठं रहातात हे काही प्रश्न निर्माण झाले. आजच्या घडीला होर्मुझ हा एक समुद्री मार्ग आहे. मात्र हे नाव इतिहासातील एका लुप्त झालेल्या बेटावरील शहराला मिळालेलं होतं. होर्मुज सामुद्रधुनीच्या जवळपासच्या भागातील मूळ निवासींचा शोध घेतला तर इतिहासात काही समिश्र उत्तरे मिळतात.
जवळपास १० व्या ते १७ व्या शताब्दीदरम्यान, होर्मुझ हे एक प्रमुख राजनैतिक राज्य होते. तिथं पारशी (इराणी) लोकसंध्या आणि अरबी लोकांचा जास्त प्रभाव होता. हिंदी महासागरातील समुद्री व्यापाऱ्यांचा इथं मोठा प्रभाव पहावयास मिळतो.
होर्मुझ राज्य १०व्या ते १७ व्या शतकापर्यंत अस्तित्वात होतं. हा भाग होर्मुझ राज्याच्या अधीन होता. ते एक समुद्री व्यापाराचं महत्वाचं केंद्र होतं. इथल्या शासकांनी भारत, पारसी आणि अरब जगतातील व्यापाऱ्यांसोबत व्यापारी संबंध विकसीत केले होते. त्यामुळं हा भूभाग सांस्कृतिकदृष्ट्या खूप विविधतांनी नटला होता.
होर्मुझ नावाची उत्पत्ती ही मिडिल पारसी (झोरास्टियन) या स्थानिक पारसी शब्दांपासून झाल्याचे मानले जात आहे. (हुर-मोग खजूरांची जागा) या भागात पारशी प्रभावाचे स्पष्ट संकेत मिळतात. तसेच समुद्र किनारी भाग असल्यानं अरबी संस्कृतीचा देखील इथं वावर दिसून येतो.
पुढे कलहात आणि दक्षिणी पर्शियाच्या मुख्य भूमीवर हल्ले झाले. अस्थिरतेमुळं हळू हळू या बेटावरील लोकं इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले.
जवळपास १५१५ ते १६२२ पर्यंत हार्मुझ बेटावर पोर्तुगीज लोकांचा कब्जा होता. यादरम्यान, यावेळी त्यांनी कार्टाज नावाचा समुद्र कर लागू केला होता. याद्वारे ते या भागातील व्यापारावर आपलं नियंत्रण ठेवत होते. पुढे १६२२ मध्ये पारशी शासक शाह अब्बास प्रथम यांनी पोर्जुगिजांना होर्मुझमधून हुसकावून लावलं. त्यानंतर या क्षेत्रावर पूर्णपणे पर्शियाचे नियंत्रण आले. हळू हळू इथली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर इराणी झाली. हाज हा भाग इराणच्या होर्मोजगान प्रांताचा भाग आहे.