USA Destroys Iran Oil Tankers pudhari
आंतरराष्ट्रीय

USA Destroys Iran Oil Tankers: होर्मुझ पुन्हा पेटलं! इराणचा US वॉरशिपवर हल्ला... चिडलेल्या अमेरिकेनं ५ तेलवाहू जहाजांना बुडवलं

Anirudha Sankpal

USA Destroys Iran Oil Tankers: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध असून देखील सुरू असून अमेरिकेने मंगळवारी ८ सप्टेंबरला पर्शियन गल्फमध्ये खार्ग बेटाजवळ इराणच्या अनेक तेल टँकरवर हल्ला केला.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने ८ सप्टेंबर रोजी इराणचे कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना टार्गेट केलं. त्यानंतर त्याचा सॅटेलाईट व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेच्या वॉरशिपवर हल्ला झाल्यावर अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या तेल टँकर्सना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे.

Centcomच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने जहाजांवर हल्ला करण्यापूर्वी त्यावरील क्रूला जहाज सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे तेल टँकर वापरण्यायोग्य राहिले नाहीत.

अमेरिकेच्या सैन्याचा दावा आहे की, इराणने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि त्याच्या प्रादेशिक प्रॉक्सी गटांना निधी पुरवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या ‘शॅडो नेटवर्क’चा भाग म्हणून या टँकरचा वापर केला होता.

५ सप्टेंबरलाही अमेरिकेचा हल्ला

सेंटकॉमने ५ सप्टेंबर रोजी इराणच्या तीन कच्च्या तेलाच्या जहाजांवर हल्ला करून ती नष्ट केली होती. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणकडून अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर आणि गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर हे हल्ले करण्यात आले.

IRGCने अमेरिकन युद्धनौकेला केले लक्ष्य

मध्य-पूर्वेतील संघर्षात केवळ अमेरिकेकडूनच हल्ले होत नाहीत. इराणच्या IRGCने गेल्या दोन दिवसांत दोन वेळा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य केले.

अमेरिकन युद्धनौकेने इराणचे दोन्ही क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावत स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये गस्त सुरू ठेवली. त्यानंतर अमेरिकन सैन्याने प्रत्युत्तर देत इराणच्या तेल टँकरवर हल्ले केले. सेंटकॉमने स्पष्ट केले की, या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा कोणताही कर्मचारी जखमी झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT