Shubhanshu Shukla return x
आंतरराष्ट्रीय

Shubhanshu Shukla return | शुभांशू शुक्ला 'ग्रहवापसी'साठी तयार, अनडॉकींगचे काऊंटडाऊन सुरु; मंगळवारी दुपारी 3 वाजता पृथ्वीवर पोहचणार

Shubhanshu Shukla return | पॅसिफिक महासागरात उतरणार, ISS वर 18 दिवस वास्तव्य, कसा होणार परतीचा प्रवास?

Akshay Nirmale

Indian astronaut Shubhanshu Shukla return ISS Ax-4 mission Ax-4 undocking live SpaceX Dragon splashdown

पुढारी ऑनलाईन डेस्क ः भारताच्या अवकाश प्रवासात 14 जुलै 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले केवळ दुसरे भारतीय, आज (14 जुलै) सायंकाळी 4.45 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत येण्यासाठी ‘अनडॉक’ होणार आहेत.

सुरवातीला ही वेळ 4.30 अशी होती. मात्र अनडॉकिंगला विलंब झाला असून आता अनडॉकिंगची वेळ 4.45 असणार आहे.

पृथ्वीवर परतीचा प्रवास कसा होणार?

  • आज दुपारी 4.30 वाजता IST Crew Dragon ‘Grace’ स्पेसक्राफ्ट ISS पासून अनडॉक करेल.

  • त्यानंतर 21 तासांनंतर, उद्या दुपारी 2.40 वाजता IST, स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल.

  • 12 ते 15 मिनिटांच्या उतरणीत, अंतराळवीरांना त्यांच्या वजनाच्या 3 ते 4 पट G-फोर्स जाणवेल.

  • 3 वाजता IST सुमारे पॅसिफिक महासागरात ‘स्प्लॅशडाउन’ होईल.

  • काही मिनिटांतच SpaceX ची बचाव टीम कॅप्सूल काढेल आणि वैद्यकीय तपासणीनंतर NASA च्या बेसकडे (बहुधा वॅन्डेनबर्ग स्पेस फोर्स बेस) रवाना करेल.

चंद्रयान-३ चा आजचा दिवसही खास

14 जुलै ही तारीख आणखी एका कारणासाठी ऐतिहासिक आहे – आजच्याच दिवशी 2023 साली चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले होते. आज त्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनाला, भारताचा दुसरा अंतराळवीर पृथ्वीवर परत येतोय – हा योगायोग नव्हे, तर भारताच्या वाढत्या अंतराळ क्षमतेचे प्रतीक आहे.

अंतराळात केलेले उल्लेखनीय प्रयोग

शुक्ला यांनी त्यांच्या 18 दिवसांच्या अंतराळ वास्तव्यात 60 हून अधिक शास्त्रीय प्रयोग केले. यामध्ये:

  • स्प्राउट्स प्रोजेक्ट: अवकाशातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात रोपवाटिका विकसित करणे

  • सेल बायोलॉजी: पेशींमधील बदल आणि मानवाचे अंतराळातील आरोग्य याचे निरीक्षण

  • AI व रोबोटिक्स: AI आधारित अंतराळस्थानकातील देखभाल व डेटा विश्लेषण

  • मटेरियल सायन्स: अवकाशातील विविध धातू व पदार्थांच्या वागणुकीचा अभ्यास

  • या प्रयोगांचे किट्स भारतातील IISc बंगळुरू, IIT, तसेच जैवतंत्रज्ञान विभागाने तयार केले होते – पूर्णतः स्वदेशी संशोधनाचे उदाहरण.

Ax-4 मिशन जागतिक सहकार्याचे प्रतीक

‘अॅक्सिअम-4 (Axiom-4)’ या खासगी आंतराळ मोहिमेच्या अंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह यूएसएच्या पेगी व्हिटसन, पोलंडच्या सावोस उझनास्की-विनिवेस्की आणि हंगेरीच्या टिबोर कापू हे अनुभवी अंतराळवीर ISS वर 18 दिवस राहून आज 14 जुलै रोजी पृथ्वीवर परतणार आहेत.

भारतासाठी अभिमानाची बाब

शुभांशू शुक्ला हे भारताचे पहिले ISS वरील अंतराळवीर असून, त्यांचे हे यश इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेच्या तयारीत एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

ही मोहीम भारतासाठी अंदाजे 500 कोटी रुपये खर्चिक असली, तरी ती भविष्यातील वैज्ञानिक संशोधन, अवकाश संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फार मोठी गुंतवणूक ठरतेय.

शुभांशू शुक्ला यांचा प्रवास भारताच्या अवकाश स्वप्नांना नवे उंचीवर घेऊन गेला आहे. अवकाशातील स्वदेशी प्रयोग, आंतरराष्ट्रीय सहकार्य, आणि भविष्यातील मानवयुक्त गगनयानासाठी याचा उपयोग होईल. हे केवळ एका व्यक्तीचे यश नाही, तर भारताच्या वैज्ञानिक परंपरेचा नवा किर्तीस्तंभ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT