मास्को ; पुढारी ऑनलाईन : रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना आज घडली. रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात गोळीबार झाल्याच्या घटनेत आठ विद्यार्थी ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियातील पर्म शहरातील स्टेट विद्यापीठ परिसरात अंदाधूंद गोळीबाराची घटना घडली. अचानक झालेल्या या हल्लानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्यासाठी दुसर्या मजल्यावरुन उड्या मारल्या. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
हल्लेखोराने काळे कपडे आणि हेल्मेट घातले होते. विद्यापीठातील विद्यार्थानेच हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंदाधूंद गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने रशियात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ ११ वाजता हल्लेखोराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार करत विद्यापीठात प्रवेश केला. यानंतर परिसरात त्याने अंदाधूंद गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने विद्यार्थ्यांनी वर्गाचे दरवाजे बंद केले. काहींनी भीतीपोटी दुसर्या मजल्यावरुन उड्या टाकल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर विद्यार्थी तिमुर बेकमार्सेव याला अटक केली आहे.
हेही वाचलं का ?