Sam Altman House Attack: सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी ज्या २० वर्षाच्या पुरूषाने OpenAI चे सीईओ सॅम अल्टमन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता त्याला अटक केली आहे. त्याने घराच्या गेटला आग लावण्याचा प्रयत्न केला होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना शुक्रवारी सकाळी नॉर्थ बीच येथील शेजाऱ्यांकडून एका कॉल आला होता. त्याला प्रतिक्रिया देत कारवाई केली. दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाने या पुरूषाची ओळख अजून पटवलेली नाही किंवा त्यांनी कोणत्या घरावर त्याने हल्ला केला याची देखील माहिती दिलेली नाही.
ओपन AI चे प्रवक्त्यांनी ही घटना अल्टमन यांच्या घरात घडल्याची माहिती दिली होती. प्रवक्त्यांनी सांगितलं की याच व्यक्तीने ओपन AI च्या सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात धमकी दिली होती.
प्रवक्ते पुढे म्हणाले, 'चांगली गोष्ट म्हणजे यात कोणी जखमी झालेलं नाही. सॅन फ्रान्सिस्को पोलिसांनी ज्या तत्परतेनं कारवाई केली त्याचे कौतुक करतो. शहराकडून आमचे कर्मचारी सुरक्षित ठेवण्यासाठी मदत केली.
ज्यावेळी पोलीस कारवाई करण्यासाठी आले त्यावेळी आरोपी पुरूष हा अल्टमन यांच्या घराजवळून पळून गेला. त्यानंतर एका तासाने तो पुन्हा ओपन AI च्या ऑफिसजवळ आला. त्याने ही संपूर्ण इमारत जाळून टाकण्याची धमकी दिली असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
सॅन फ्रान्सिस्को पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा व्यक्ती अजून त्यांच्या अटकेत आहे किंवा नाही याबाबत भाष्य करणं टाळलं. पोलिसांनी सध्या तपास सुरू आहे असं उत्तर दिलं.
सॅम अल्टमन हे बिलेनियर असून त्यांच्या नावावर अनेक प्रॉपर्टीज आहेत. मात्र ते मुख्यत्वे सॅन फ्रान्सिस्को इथंच राहतात. तिथेच अल्टमन यांनी ओपन AI ची स्थापना केली होती. ते AI जगतातील एक प्रमुख व्यक्तीमत्व आहेत. अल्टमन हे टेक विश्वातील एक प्रसिद्ध सीईओ आहेत.