Russia Fab 3000 Bomb pudhari
आंतरराष्ट्रीय

Russia Fab 3000 Bomb: अख्ख्या जगाचे डोळे होर्मुजवर असताना रशियाने मोठा कांड केला... FAB-3000 बॉम्बने युक्रेन हादरले

Anirudha Sankpal

Russia Uses Fab 3000 Glide Bomb: अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष पुन्हा उफाळून आला असून पुन्हा एकदा होर्मुज ब्लॉक करण्यात आलं आहे. याकडे अख्ख्या जगाचं लक्ष असताना तिकडं रशियाने एक मोठा कांड केला असून यामुळं युक्रेन चांगलंच हादरलं आहे. रशियाने युक्रेनच्या जापोरिज्जिया क्षेत्रात FAB-3000 ग्लाईड बॉम्ब टाकला आहे. त्यांनी हे हल्ले ओरिखोवे शहर, डोनेत्स्कच्या शचुरोवो भागात केले. विशेष म्हणजे FAB-3000 ग्लाईड बॉम्बमध्ये जवळपास १.४ टन विस्फोटक असतात. तर या एका बॉम्बचे वजन हे ३ टन इतके असते.

FAB-3000 हा रशियाचा वजनदार बॉम्ब असून त्याचे वजन हे ३००० किलो म्हणजे ३ टन इतकं असतं. यात जवळपास १.४ टन स्फोटके भरलेली असतात. हा बॉम्ब ग्लाईड तंत्रज्ञानाने सज्ज असून हा बॉम्ब विमानातून सोडल्यानंतर अनेक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टार्गेटवर अचूक जाऊन पडतो. त्यामुळं पायलटला शत्रूच्या एअर डिफेन्स रेंजच्या बाहेरून हल्ला करता येतो.

रशियन एरोस्पेस फोर्सेस (VKS) या बॉम्बचा वापर युक्रेनची लष्करी ठिकाणे नष्ट करण्यासाठी करत आहे. शचुरोवो आणि ओरिखावे या सारख्या भागात युक्रेनचे लष्करी अड्डे आहेत. तिथं दारू गोळा डेपो आणि कमांड सेंटर्स आहेत त्यावर हा हल्ला करून त्याचे मोठे नुकसान करण्यात आलं आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या काही दिवसात FAB-3000 सह अनेक इतर एरियन बॉम्बचा वापर शचुरोवो, उस्तिनोवका आणि ब्लागोडातोवका या युक्रेनच्या लष्करी अड्ड्यांवर हल्ला केला गेला. रशियाने दावा केला आहे की यामुळं युक्रेनच्या ब्रिगेडची क्षमता फार कमी झाली आहे.

रशियाने हा हल्ला डीप बॅटल रणनितीअंतर्गत केला आहे. यात फ्रंटलाईच्या आधीच्या भागांवर हल्ला केले जातात. त्यामुळं युक्रेनी सैन्याला मागे ढकलण्यास आणि त्यांची सप्लाय लाईन कापण्यात मदत मिळते.

रशियाचा FAB-3000 सारखा बॉम्ब हा रशिया - युक्रेन युद्धाला अजूनच रक्तरंजीत बनवत आहे. हा बॉम्ब इतका शक्तीशाली असतो की तो आसपासच्या शेकडो किलोमीटरचा विनाश करू शकतो. रशियाजवळ FAB-500, FAB-1500 आणि FAB-3000 सारखे ग्लाईड बॉम्ब आहेत. याचा मोठा साठा त्यांच्याकडे आहे. याचा वापर २०२४ ते २०२५ मध्ये वाढत आहे.

युक्रेनकडे या शक्तीशाली बॉम्बला प्रत्युत्तर देण्यासाठी उपयुक्त एअर डिफेन्स सिस्टम नाही. त्यांना याबाबत पश्चिम देशांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागते. याचाच रशिया फायदा उचलत आह.

रशिया सध्या जोनेत्स्क, खार्किव आणि जापोरिज्जिया भागात आक्रमक हल्ला करत आहे. यामुळं युक्रेन सैनिकांना दारू गोळ्याची कमतरता, लष्करी कमतरता या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. पश्चिमी देश युक्रेनला मदत करत असले तरी युक्रेनसाठी हे युद्ध थकवणारं झालं आहे.

या युद्धामुळं युरोपमधील सुरक्षा आणि जागतिक खाद्य सुरक्षा देखील प्रभावित झाली आहे. सततच्या बॉम्ब हल्ल्यामुळं नागरिकांचे नुकसान होत असून आंतरराष्ट्रीय समुदाय देखील शांततेचे आवाहन करत आहे. मात्र अजून तरी हे युद्ध थांबण्याचे संकेत मिळत नाहीयेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT