सेंट पिटर्सबर्ग : अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विशेष दूत किरी डिमिट्रीव्ह यांनी विमानतळावर स्वागत केले. 
आंतरराष्ट्रीय

Putin Witkoff St Petersburg meeting -युक्रेन युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेकडून नवे प्रयत्न

Putin Witkoff St Petersburg meeting- सेंट पीटर्सबर्गमध्ये पुतीन-विटकॉफ यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक, युक्रेनमध्ये पकडलेल्या अमेरिकन नागरिकाची रशियाकडून सुटका

पुढारी वृत्तसेवा

सेंट पीटर्सबर्ग (रशिया) : वृत्तसंस्था

युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यात सेंट पीटर्सबर्गमधील भव्य 'कॉन्स्टन्टाईन पॅलेस' येथे बुधवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वांत रक्तरंजित ठरलेला हा संघर्ष संपवण्यासाठी वॉशिंग्टनकडून सुरू असलेल्या नव्या शांतता प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

सेंट पीटर्सबर्गमध्ये पोहोचण्यापूर्वी विटकॉफ यांनी नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, फिनलंड व नॉर्वेचे नेते तसेच नाटो आणि युरोपीय प्रतिनिधींसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत युक्रेनने युद्ध संपवण्यासाठी सुरक्षेच्या हमींसह काही नव्या शांतता योजना मांडल्या होत्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केले की, ऑस्लोमधील सकारात्मक चर्चेतील मुद्दे घेऊनच विटकॉफ रशियाशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत.

स्टारलिंकवरून तणाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत केलेल्या डिझेल करारानंतर अमेरिका-युक्रेन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. युक्रेनला मिळणाऱ्या उपग्रह दळणवळण व्यवस्थेत अडथळे येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. इलॉन मस्क यांनी युक्रेन वापरत असलेल्या स्पेसएक्सच्या स्टारशील्ड/स्टारलिंक प्रणालीचा वेग कमी करण्याचे आदेश दिले होते, ज्यावर युक्रेनियन सैन्य रशियन क्षेपणास्त्र हल्ले ट्रॅक करण्यासाठी अवलंबून आहे; मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळत प्रणाली पूर्ववत कार्यरत असल्याचे स्पष्ट केले.

ट्रम्प यांचा झेलेन्स्कींवर दबाव अन् त्रिपक्षीय चर्चेची अपेक्षा

डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर युद्ध थांबवण्यासाठी तोडगा काढण्याचा दबाव वाढवला आहे. युक्रेनने आता शांतता करारासाठी पुढे यावे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. युद्ध समाप्तीसाठी पुतीन, ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात त्रिपक्षीय शिखर बैठक व्हावी, अशी अपेक्षा युक्रेनला आहे. रशियाने मात्र अशा कोणत्याही थेट चर्चेपूर्वी संपूर्ण मुत्सद्दीपूर्ण पूर्वतयारी असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

सद्भावना म्हणून अमेरिकन शिक्षकाची सुटका

पुतीन आणि विटकॉफ यांच्यातील समोरासमोरील ही नववी बैठक होती. या चर्चेची सुरुवात रशियाने एका सकारात्मक स‌द्भावनेन केली. रशियामध्ये भाडोत्री सैनिक असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले ७४ वर्षीय माजी अमेरिकन शिक्षक स्टीफन हबार्ड यांची रशियाने सुटका केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विटकॉफ यांना माहिती दिली की, हबार्ड विमानात बसून मायदेशी परतण्यासाठी विमानतळावर सज्ज आहेत. विटकॉफ यांनी या निर्णयाबद्दल रशियाचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT