Vande Mataram In Slovakia pudhari
आंतरराष्ट्रीय

Vande Mataram In Slovakia: स्लोवाकियात वाजलं वंदे मातरम... पंतप्रधान नरेंद्र मोदी जंगी स्वागताने भारावले

Anirudha Sankpal

Vande Mataram In Slovakia: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्लोवाकिया देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. ते रविवारी स्लोवाकियाच्या ब्रटिस्लावा इथं पोहचले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वंदे मातरम या गाण्याने स्वागत करण्यात आलं. हे गाणं प्रसिद्ध लुस्निका यांनी गायलं. यावेळी इंडियन डायसपुराच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्साहात स्वागत केलं.

स्लोवाकियाला १९९३ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी या देशाचा दौरा केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्लोवाकियाच्या निर्मितीनंतर या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. या दौऱ्यावर दोन्ही देशांमधील भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्स पोस्ट करत, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्लोवाकियामध्ये दाखल झाले आहेत. ते स्लोव्हाकियाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यामुळं स्लोवाकिया आणि भारत यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांमध्ये एक ऐतिहासिक माईल स्टोन तयार झाला आहे.'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानेर यांनी स्वागत केलं. त्यांनी पंतप्रधानांना ब्रेड आणि मीठ खायला दिलं. स्लोवाकियाच्या परंपरेनुसार ब्रेड आणि मीठ देऊन आदरातिथ्य केलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीत दोन्ही देशातील संबंध मजबूत करणे आणि नवीन भागीदारी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान ब्रातिस्लावामधील हॉटेलमध्ये दाखल झाल्यावर Lucnica Ensemble यांनी वंदे मातरंम गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केला. या ग्रुपने ज्यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २०२५ मध्ये स्लोवाकियाचा दौरा केला होता त्यावेळी देखील भारताचे राष्ट्रगीत गायले होते.

या ग्रुपमधील एका सदस्याने आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला की, 'हा खूपच चांगला अनुभव होता. ते खूप नम्र आणि कृतज्ञ होते. माझ्यासाठी हा खूपच स्मरणीय क्षण होता कारण यापूर्वी मी कधीही पंतप्रधानांपुढे असे सादरीकरण केलं नव्हतं.' दुसरी एक सदस्य इव्हा यांनी सांगितलं की, 'ते खूप विनंम्र होते. जसे प्रत्येक भारतीय असतात तसे ते खूप प्रेमळ होते.'

वंदे मातरंम प्रमाणेत स्लोवाकच्या एका म्युजिकल ग्रुप महादेव किर्तन प्रोजेक्ट यांचा देखील आध्यात्मिक परफॉरमन्स पाहिला. यावेळी ड्रमर मार्क यांनी भारतीय नेत्यासमोर सादरीकरण करायला संधी मिळाली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT