West Asia crisis India impact | 'शांत राहा, घाबरू नका': प. आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह नेमकं काय म्‍हणाले?

सरकार पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्‍यासाठी उचलत आहे ठोस पावले
 West Asia crisis India impact
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्‍या अध्‍यक्षतेखाली 'अनौपचारिक सक्षम गट' (IGoM) ची बैठक पार पडली.Pudhari
Published on
Updated on

West Asia crisis India impact

नवी दिल्‍ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 'अनौपचारिक सक्षम गट' (IGoM) ची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, सरकार पुरवठा साखळीत (Supply Chain) कोणतीही कमतरता किंवा अडथळा येऊ नये यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे.

राजनाथ सिंह यांनी घेतली IGoM ची बैठकी

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती सतत गंभीर होत असून, त्याचे पडसाद भारतावरही उमटताना दिसत आहेत. व्यापारी मार्गांवर दबाव वाढत असून गॅस आणि तेलासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सोमवारी 'अनौपचारिक सक्षम गटा'ची (IGoM) पाचवी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते.

 West Asia crisis India impact
PM Modi Appeal: देश आर्थिक संकटात? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय काय सांगितलं? A to Z माहिती जाणून घ्या

पुरवठा साखळीवर सरकारचे लक्ष

या बैठकीत ऊर्जा पुरवठा साखळी आणि देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेशी संबंधित संभाव्य जोखमींचा आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' पोस्‍टमध्‍ये लिहिलं की, "मी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारे न घाबरण्याचे आवाहन करतो, कारण सरकार पुरवठा साखळीतील कोणताही अडथळा रोखण्यासाठी ठोस पावले उचलत आहे."

 West Asia crisis India impact
PM Modi on Gold: एक वर्ष सोनं खरेदी करु नका; पेट्रोल आणि डिझेल... जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींचे आवाहन

पंतप्रधानांचे आत्मनिर्भरतेचे आवाहन

जागतिक उलथापालथ आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी जनतेने सामूहिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. हे आवाहन आत्मनिर्भरता आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, कठीण जागतिक काळात ऊर्जा बचतीसाठी पंतप्रधानांनी दिलेला हा एक मोठा संदेश असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

 West Asia crisis India impact
PM Modi Speech Impact: मोदींच्या एका आवाहनाने अर्थव्यवस्थेत खळबळ; कोणती 5 क्षेत्रं सर्वाधिक संकटात?

काय म्हणाले होते पंतप्रधान?

रविवारी तेलंगणातील सिकंदराबाद येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशहितासाठी आपल्याला ठरवावे लागेल की, वर्षभर घरात कोणताही कार्यक्रम असला तरी आपण सोन्याचे दागिने खरेदी करणार नाही." यावेळी त्यांनी कोरोना काळातील परिस्थितीचाही संदर्भ दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news