Pakistan Army In Gaza:
पाकिस्तानचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पाकिस्तान आपलं लष्कर गाझा पट्टीत पाठवण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यांनी पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय शांती मोहिमेच्या अंतर्गत गाझामध्ये सैनिक तैनात करण्यास तयार आहे. मात्र पाकिस्तानची यासाठी एक अट आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले आम्ही तयार आहोत मात्र पाकिस्तानचे सैनिक पॅलेस्टाईनच्या दहशतवादी हमासला शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडणार नाहीत. आम्ही फक्त शांती प्रस्थापित करण्यासाठी तिथं जाणार आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे वक्तव्य अमेरिकेच्या पुढाकारानं सुरू असलेल्या गाझा शांती करारावरील चर्चेला वेग आल्यानंतर केलं आहे. या करारात मुस्लिम बहूल देशाच्या सैनिकांनी मिळून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण बल स्थापन करण्याची तरतूद आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे सैन्य पाठवण्याचा निर्णय हा पंतप्रधानांनी फील्ड मार्शल यांच्याशी चर्चा करून घेतला असल्याचं सांगितलं.
पत्रकार परिषदेत इशाक डार म्हणाले, 'पाकिस्तान फक्त संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्पष्ट भाषेतल्या आदेशानुसारच आपलं सैन्य पाठवणार आहे. पाकिस्तानी सैन्य हमासला शस्त्र खाली ठेवण्यासाठी आपली भूमिका बजावणार नाहीये.
डार यांनी भर दिला की, हमासच्या निरस्त्र करण्याचा मुद्दा हा रियादमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीदरम्यान समोर आला होता. पाकिस्तान अशा प्रकारच्या कोणत्याही प्रयत्नात सहभागी होणार नाही. आम्ही यासाठी तयार नाही. हे आमचं काम नाही. हे काम पॅलेस्टाईन कायदेशील संस्थांचं काम आहे. आमचं काम हे हे शांतता प्रस्थापित करणं आहे. शांतता लागू करण्याचं आमचं काम नाही.'
पाकिस्तानचं काम शांतता सुनिश्चित करणे हे आहे. आम्ही गाझामध्ये आमचं सैन्य पाठवण्यास तयार आहोत. मात्र आंतरराष्ट्रीय स्थैर्य बलाचा याबाबत स्पष्ट आदेश येणं गरजेचं आहे.
डार यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासाठी तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र हे सर्व ISF चा स्पष्ट आदेश आणि कार्यक्षेत्र स्पष्ट करण्यावर अवलंबून आहे. इंडोनेशियाने या मोहिमेसाठी २० हजार सैनिक पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानला हमासचे निशस्त्रीकरण करण्याची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा होती.
यामुळं पाकिस्तानमध्ये राजकीय विरोध होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि सरकारी प्रवक्त्याच्या या विधानाला तथ्यहीन आणि अस्विकार्य ठरवून त्यावर टीका केली होती.