Pakistan PM Shehbaz Sharif typo I condom tweet Israel Iran war condemn mistake controversy
नवी दिल्ली : इस्त्रायल-ईराण संघर्षावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या एका कथित सोशल मीडिया पोस्टमुळे इंटरनेटवर एक नवा वाद निर्माण झाला आहे. एका व्हायरल स्क्रीनशॉटनुसार, शरीफ यांनी “I condemn” ऐवजी चुकून “I condom” असे लिहिले.
या टायपोमुळे इराण विरूद्ध इस्रायल युद्धाच्या गंभीर विषयावरील चर्चा अचानक विनोदात रूपांतरित झाली. यावरून अनेक नेटिझन्सनी पाक पंतप्रधान शरीफ यांची खिल्ली उडवली आहे.
शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणची अणु-संरचना आणि लष्करी अधिकारी लक्ष्य झाले. या पार्श्वभूमीवर शहबाज शरीफ यांनी सोशल मीडियावर इस्त्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये असं दिसतं की त्यांनी "I condom the attack on Iran by Israel…" असं लिहिलं आहे.
या स्क्रीनशॉटनंतर सोशल मीडियावर मीम्स आणि विनोदांचा अक्षरशः पाऊस पडला. काहींनी त्याला "टायपो ऑफ द इयर" म्हटलं, तर काहींनी "I condom this too" असं म्हणत ट्रेंड सुरू केला. एका वापरकर्त्याने म्हटलं, "एक ऐतिहासिक क्षण – जेव्हा ऑटोकरेक्टने कुटनितीपेक्षा जास्त फटका दिला."
या स्क्रीनशॉटची सत्यता मात्र अजूनही स्पष्ट नाही. कोणत्याही विश्वासार्ह माध्यमाने अशी पोस्ट दाखवलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत वृत्तसंस्था जसे की Radio Pakistan आणि The Express Tribune यांनी 13 जून 2025 रोजी जाहीर केलेल्या निवेदनांमध्ये "condemn" हा शब्द योग्यरित्या वापरलेला आहे.
दरम्यान, AI मॉडेल Grok ला विचारल्यावर ते म्हणाले की मूळ पोस्ट हटवलेली असल्याने ती पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे हा टायपो खरा होता की फोटो एडिट केला होता, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
शहबाज शरीफ यांनी "I condom" असा शब्द वापरल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला असला, तरी त्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
बहुधा हा एक फोटोशॉपद्वारे एडिट केलेला स्क्रीनशॉट आहे किंवा एखादा चूकलेला टायपो तातडीने दुरुस्त करण्यात आला असावा.
मात्र सोशल मीडियावर ही चूक चर्चेचा आणि विनोदाचा विषय बनली, त्यातून पाकिस्तानची आणि त्यांच्या पंतप्रधानांच्या अज्ञानाची मजा नेटकऱ्यांनी घेतली.