Falcon-9 rocket failure | ISRO मुळे टळली अंतराळातील मोठी दुर्घटना; SpaceX ला थांबवले अन्यथा...

Falcon-9 rocket failure | Falcon-9 मधील तांत्रिक दोष उघड, भारतीय शास्त्रज्ञांची जागतिक दखल
ISRO - Falcon-9 rocket Mission
ISRO - Falcon-9 rocket MissionPudhari
Published on
Updated on

Falcon-9 rocket failure avoided | ISRO saves Axiom-4 mission | Indian astronaut Shubhanshu Shukla safety

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुन्हा एकदा सिद्ध केलं की अंतराळ विज्ञानात गुणवत्ता आणि सुरक्षिततेला पर्याय नाही. Axiom-4 मिशन साठी तयार करण्यात आलेल्या SpaceX Falcon-9 रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वी आढळलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे चार अंतराळवीरांचा जीव धोक्यात आला असता.

मात्र, ISRO चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या कठोर निरीक्षणामुळे आणि तांत्रिक सल्ल्यामुळे ही भीषण दुर्घटना टळली. यामध्ये भारताचा अंतराळवीर गट कॅप्टन शुभांशू शुक्ला सुद्धा सहभागी असल्याने ही घटना भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरते. एनडीटिव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ISRO ची निर्णायक भूमिका

ISRO चे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी अमेरिकेतील Axiom-4 मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षेच्या बाबतीत आपला ठामपणा दाखवत, फाल्कन-9 रॉकेटमधील संभाव्य धोका उघडकीस आणला. ही रॉकेट भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या चार अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार होती.

"लिक" (गळती) असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण 11 जून रोजी नियोजित होते. पण, ISRO ने सखोल चाचण्या आणि "लो टेंपरेचर लिक टेस्ट" ची मागणी केली. स्पेसएक्सकडून यावर तात्पुरत्या उपायांची तयारी होती – मात्र ISRO ने ती साफ नाकारली.

ISRO - Falcon-9 rocket Mission
Pizza orders Pentagon | पेंटॅगॉनजवळील दुकानांतून पिझ्झाच्या मागणीत मोठी वाढ; हा ‘पिझ्झा इंडेक्स’ मानला जातो युद्धाचा संकेत...

कसा उघड झाला दोष?

  • 7 सेकंदांची हॉट फायर टेस्ट दरम्यान ऑक्सिडायझरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळली.

  • नंतरची तपासणी दरम्यान, ऑक्सिडायझर लाईनमध्ये वेल्ड क्रॅक (भेग) आढळली.

  • ही भेग "रीसायकल आणि रिफर्बिशड" स्टेजमध्ये होती – ती अद्याप दुरुस्त केली नव्हती.

  • ISRO च्या तज्ज्ञांच्या आग्रहाने तो भाग बदलण्यात आला आणि पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.

ISRO ची तांत्रिक ताकद

डॉ. नारायणन हे क्रायोजेनिक इंजिन विकसित करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके त्यांना स्पष्ट माहीत होते.

ISRO च्या 13 सदस्यीय तज्ज्ञ पथकाने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर थेट हस्तक्षेप केला. त्यांनी "सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर" ही भूमिका घेतली.

ISRO - Falcon-9 rocket Mission
ChatGPT energy consumption | एका ChatGPT क्वेरीसाठी किती उर्जा आणि पाण्याचा वापर होतो? सॅम ऑल्टमन यांचा मोठा खुलासा

भारतासाठी महत्त्व का?

  • Axiom-4 मिशनमध्ये भारताने 550 कोटी रूपये खर्चून जागा घेतली आहे.

  • भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेतील प्रमुख सहभागी आहेत.

  • त्यांच्या सुरक्षिततेसाठी ISRO आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही.

  • पोलंड आणि हंगेरीनेही ISROच्या भूमिकेचे समर्थन केले.

ISRO - Falcon-9 rocket Mission
Chennai AC lounges for delivery agents | डिलिव्हरी एजंटसाठी देशातील पहिले AC लाऊंज चेन्नईत सुरू; कामगारांच्या सन्मानासाठी महापालिकेचा निर्णय

मिशनची सद्यस्थिती

  • फाल्कन-9 रॉकेटची "वेट ड्रेस रिहर्सल" पूर्ण झाली आहे.

  • नवीन प्रक्षेपणाची तारीख ठरली आहे- 19 जून 2025.

  • मिशनसाठी चार अंतराळवीर सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) झ्वेझ्दा मॉड्यूलमध्ये दबाव समस्येचे परीक्षण सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news