Nvidia Jensen Huang Controversy pudhari
आंतरराष्ट्रीय

Nvidia Jensen Huang Controversy: एनवीडियाच्या सीईओंना पत्नीला धोका देणं पडणार महागात; संपत्तीत होणार मोठी घट?

Anirudha Sankpal

Nvidia Jensen Huang Controversy: एनवीडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांनी त्यांची पत्नी लोरी हुआंगला धोका दिला. त्याची आता त्यांनी कबुली देखील दिली आहे. त्यानंतर आता त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर जेनसन हुआंग यांचा घटस्फोट झाला तर त्यांना त्यांची निम्मी संपत्ती गमवावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट होण्याची शक्यता आहे.

जेनसन हनी ट्रॅपमध्ये अडकले?

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या महिलेसोबत जेनसन यांचे अफेअर असल्याचा आरोप झाले. त्यानंतर एनवीडिया सीईओ जेनसन हुआंग यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा भूकंप आला आहे. त्याने आपण पत्नीला धोका दिल्याचे मान्य केलं आहे. त्यानंतर त्यांचा आता घटस्फोट होणार याची चर्चा जोरात सुरू आहे.

जवळपास ७.८ लाख कोटी रूपये

मात्र यात सर्वात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे जर १५५ अब्ज डॉलरचे मालक असलेले जेनसन यांचा घटस्फोट झाला तर त्यांना आपल्या संपत्तीतील अर्धा हिस्सा हा त्यांच्या पत्नीला द्यावा लागणार आहे. त्यांना त्यांच्या पत्नीला जवळपास ८१.१ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ७.८ लाख कोटी रूपये द्यावे लागणार आहेत. हा जगातील सर्वात मोठा घटस्फोट ठरू शकतो.

तर जगातील सर्वात महागडा घटस्फोट

जर एनवीडियाचे सीईओ जेनसन यांचा घटस्फोट झाला तर संपत्तीची विभागणी ही ८१.१ अब्ज डॉलर होईल. जर असं झालं तर हा सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. याची तुलना अमेझॉनचे संस्थापक जेस बेजोस यांच्या घटस्फोटाशी होईल. २०१९ मध्ये जेफ आणि मॅकेंजी यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी जेफ यांना मॅकेंजी यांना ३५.६ अब्ज डॉलरची संपत्ती द्यावी लागली होती.

तसेच मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स यांनी देखील मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्यासोबत घटस्फोट घेतला होता. त्यावेळी देखील त्यांना मोठी संपत्ती ट्रान्सफर करावी लागली होती. अशात आता जेनसन आणि लोरी मिल्स यांचा घटस्फोट झाला तर तो जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट ठरू शकतो. तसेच कंपनीच्या शेअर होल्डिंगचे स्ट्रक्चर देखील बदलू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT