Namdev Gharal
अमेरिकास्थित कंपनी एनव्हिडिया (NVIDIA) ने प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्स (अंदाजे ₹335 लाख कोटी) मार्केट कॅपचा टप्पा गाठला. अशाच जगभरातील ट्रीलियन डॉलर्स मुल्य असलेल्या कंपन्याविषयी जाणून घेऊया
या कंपनीचे सर्वाधिक मार्केट कॅप: $4.02 ट्रिलियन इतके असून ही चिप निर्मितीतील अग्रगण्य कंपनी असून एनव्हिडियाने AI क्रांतीच्या जोरावर $4 ट्रिलियनचा टप्पा गाठला
मार्केट कॅप: $3.75 ट्रिलियन असून मायक्रोसॉफ्टने AI-पॉवर्ड सॉफ्टवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमुळे आपली आघाडी कायम राखली आहे. कंपनीने OpenAI सोबत भागीदारीतून AI क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.
मार्केट कॅप: $3.15 ट्रिलियन असून iPhone, iPad आणि Mac साठी प्रसिद्ध असलेली ॲपल 2018 मध्ये $1 ट्रिलियनचा टप्पा गाठणारी पहिली कंपनी होती.
मार्केट कॅप: $2.48 ट्रिलियन असून Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट सर्च इंजिन, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि Waymo सारख्या ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानात आघाडीवर आहे.
मार्केट कॅप: $2.12 ट्रिलियन असून ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमधील जागतिक स्तरावरील आघाडीची ही कंपनी आहे.
मार्केट कॅप: $1.65 ट्रिलियन असून फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा सोशल मीडियापासून मेटाव्हर्स आणि AI पर्यंत विस्तार करत आहे.
मार्केट कॅप: $1.22 ट्रिलियन असून जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर फाउंड्री TSMC ॲपल, एनव्हिडिया या कंपन्यासाठी चिप्स बनवते
मार्केट कॅप: $1.18 ट्रिलियन आहे. तेल उद्योगातील दिग्गज सौदी अरामको ही कंपनी 2022 मध्ये काही काळ जगातील सर्वात मूल्यवान कंपनी होती. तेलाच्या मागणीवर कंपनीचे मार्केट कॅप अवलंबून आहे.
मार्केट कॅप $1. 06 ट्रिलियन आहे ही कंपनी सेमिकंटकर्टस तयार करते. AI मुळे चिप निर्मितीमध्ये या कंपनीने आघाडी घेतली आहे. वायरलेस, नेटवर्किंग, ब्रॉडबँड, या क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे.
मार्केट कॅप: $1.05 ट्रिलियन आहे. वॉरन बफे यांच्या नेतृत्वाखालील बर्कशायर हॅथवे ही गुंतवणूक कंपनी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते, ज्यात विमा आणि रिटेलचा समावेश आहे.