आंतरराष्ट्रीय

उत्‍तर कोरियाचे रॉकेट झाले फुस्‍स…; जपान म्‍हणाले ‘हे’ जगासाठी धोकादायक

निलेश पोतदार

सियोल : पुढारी ऑनलाईन उत्‍तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचे क्षेपणास्‍त्रांवरील प्रेम जग जाहीर आहे. उत्तर कोरिया नेहमीच कोणत्‍या न कोणत्‍या क्षेपणास्त्रांची चाचणी करून जगाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता असे काही घडले आहे की ज्यामुळे किम जोंग उन संपूर्ण जगात बदनाम ठरला आहे. ज्‍या क्षेपणास्‍त्राच्या प्रक्षेपणाकडे उत्‍तर कोरिया मोठ्या आशेने पाहत होता ते क्षेपणास्‍त्र हे फक्‍त फुसका बार ठरले.

क्षेपणास्‍त्रामध्ये झाला स्‍फोट

गुप्तचर उपग्रह अवकाशात तैनात करण्यासाठी उत्तर कोरियाने सोडलेल्या रॉकेटचा टेक ऑफ झाल्यानंतर लगेचच स्फोट झाला. हा स्‍फोट म्‍हणजे उत्‍तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासाठी एक मोठा झटका मानला जात आहे. किम हे खरे तर अमेरिका आणि उत्‍तर कोरियावर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहाच्या तैनातीच्या विचारात होते. मात्र यामध्ये त्‍यांना यश मिळाले नाही.

महत्‍वाची होती प्रक्षेपणाची वेळ

उत्तर कोरियाच्या प्रक्षेपणास्‍त्राचे अपयश अशा वेळी आले आहे, जेव्हा दक्षिण कोरिया, चीन आणि जपानचे नेते चार वर्षांपेक्षा जास्त काळातील पहिल्या त्रिपक्षीय बैठकीचा भाग म्हणून सोलमध्ये भेटले आहेत. उत्‍तर कोरियाकडून अशाप्रकारची उकसवण्याची कारवाईला असामान्य मानण्यात येत आहे. तेही जेव्हा त्याचा मुख्य मित्र चीन या प्रदेशात उच्चस्तरीय राजनैतिक चर्चा करत आहे.

शेजारील देशांकडून झाली टीका

या प्रक्षेपणावर उत्तर कोरियाच्या शेजारील देशांनी टीका केली होती कारण संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाला असे कोणतेही प्रक्षेपण करण्यास बंदी घातली आहे. उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, त्यांनी मुख्य वायव्य स्पेस स्टेशनवरून नवीन रॉकेटवर गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला. पण टेकऑफ झाल्यानंतर लगेचच रॉकेटचा स्फोट झाला, इंजिनमध्ये बिघाड झाल्याचा संशय आहे.

जपानने म्हटले होते…

जपानचे संरक्षण मंत्री मिनोरू किहारा यांनी उत्तर कोरियाचे प्रक्षेपण "संपूर्ण जगासाठी एक गंभीर आव्हान" असल्याचे म्हटले आहे. उत्‍तर कोरियाने उपग्रह प्रक्षेपण हे चिथावणीखोर पाऊल असल्याचे वर्णन केले होते आणि त्यामुळे प्रादेशिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असेही म्हटले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT