New York Airport Accident file photo
आंतरराष्ट्रीय

New York Airport Accident: १०० प्रवाशांनी भरलेलं विमान अग्निशमन दलाच्या गाडीला धडकलं; एअर कॅनडाच्या विमानाचा भीषण अपघात

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर आज सकाळी मोठा विमान अपघात झाला.

मोहन कारंडे

New York Airport Accident:

न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर आज पाहाटे मोठा विमान अपघात झाला. खराब हवामानामुळे धावपट्टीवर दृश्यमानता कमी असल्याने, गेटच्या दिशेने जात असलेले 'एअर कॅनडा'चे विमान भरकटले आणि धावपट्टीवर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला जाऊन धडकले. या अपघातात पायलट आणि सह-पायलट गंभीर जखमी झाले होते, उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अग्निशमन गाडीतील दोन कर्मचारी गंभीर जखमी आहेत.

'एअर कॅनडा एक्सप्रेस CRJ-900' हे विमान मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला पोहोचले होते. लँडिंगनंतर गेटच्या दिशेने जात असताना धावपट्टीवर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला विमानाने जोराची धडक दिली. या अपघातावेळी विमानात सुमारे १०० प्रवासी होते. सुदैवाने, प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते, मात्र धडकेमुळे विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

विमानतळ ठप्प, सर्व उड्डाणे रद्द

या घटनेनंतर फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने ला गार्डिया विमानतळावरील सर्व उड्डाणे तत्काळ थांबवण्यात आली आहेत. सुरुवातीला ही बंदी काही तासांसाठी होती, परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ती वाढवण्यात आली आहे.

सध्या विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा धावपट्टीवरील मलबा हटवण्याचे आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे काम करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान आणि कमी दृश्यमानता हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT