मोनालिसा चित्रासह जगातील ऐतिहासिक कलाकृती असलेले पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून नेपोलियन काळातील दागिने चोरीला गेल्‍याची धक्‍कादायक माहिती आज उघडकीस आली आहे.  
आंतरराष्ट्रीय

Paris museum : फ्रान्‍समधील जगप्रसिद्ध संग्रहालयातून नेपोलियन काळातील दागिने चोरीस!

लूव्र संग्रहालय दिवसभरासाठी ठेवण्‍यात आले बंद, चोरीला गेलेल्‍या दागिन्यांची किंमत अद्याप तपासली जात आहे

पुढारी वृत्तसेवा

Napoleon Era Jewels Stolen From Louvre Museum

पॅरिस : मोनालिसा चित्रासह जगातील ऐतिहासिक कलाकृती असलेले पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून नेपोलियन काळातील दागिने चोरीला गेल्‍याची धक्‍कादायक माहिती आज उघडकीस आली. या घटनेनंतर लूव्र संग्रहालय आज दिवसभरासाठी बंद ठेवण्‍यात आले. चोरट्यांनी हायड्रॉलिक शिडी वापरून संग्रहालयात प्रवेश करत अमूल्य दागिन्‍यांवर डल्‍ला मारला, असे फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. तसेच ही सर्वात मोठी चोरी असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, चोरीला गेलेल्‍यला दागिन्यांची किंमत अद्याप तपासली जात आहे, असे एएफपीने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे.

तपासादरम्यान संग्रहालय बंद

एक्‍स पोस्‍टमध्‍ये फ्रान्‍सच्‍या सांस्‍कृतिक मंत्री रचिदा दाती यांनी म्‍हटलं आहे की, "आज सकाळी अपवादात्मक कारणांमुळे लूव्र संग्रहालय बंद राहील. दरम्‍यान, फ्रान्‍समधील दैनिक ले पॅरिसियनने म्‍हटलं आहे की, चोरट्यांनी जगातील सर्वाधिक पर्यटक भेट देत असलेल्‍या संग्रहालयात दर्शनी भागाद्वारे प्रवेश केला. जिथे बांधकाम सुरू आहे.अपोलो गॅलरीमधील लक्ष्यित खोलीत प्रवेश करण्यासाठी मालवाहू लिफ्टचा वापर केला. खिडक्या तोडल्यानंतर दरोडेखोरांनी नेपोलियन आणि महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहातील नऊ तुकडे चोरले.

लूव्र संग्रहालयातून १९११ मध्‍ये झाली होती मोनलिसा चित्राची चोरी

जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून चोरी आणि दरोड्याच्या प्रयत्नांचा मोठा इतिहास आहे. १९११ मध्ये मोना लिसा चित्राची चौकटीतून गायब झाली. विन्सेंझो पेरुगिया म्हणून ओळखला जाणारा चोर संग्रहालयात लपला आणि त्याच्या कोटाखाली पेंटिंग घेऊन बाहेर पडला. या चित्राचाच शोध अखेर दोन वर्षांनंतर फ्लोरेन्समध्ये संपला. अखेर लिओनार्डो दा विंचीचे मोना लिसाचे पोर्ट्रेट जगातील सर्वात प्रसिद्ध कलाकृती बनले. लूव्र संग्रहालयात १९८३ मध्ये झालेली चोरी जगप्रसिद्ध झाली होती. संग्रहालयातील दोन चिलखत चोरीला गेले होते. तब्‍बल ४० वर्षांनंतर हे चिलखत जप्त करण्यात आले होते.

लूव्र संग्रहालयात ३३,००० हून अधिक पुरातन आणि मौल्‍यवान वस्‍तू

जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालय हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. येथे दिवसाला ३० हजारांहून अधिक लोक भेट देतात. या संग्रहालय अनेक खास आणि मौल्यवान (३३,००० हून अधिक) पुरातन वस्तू, शिल्पे, चित्रे आहेत.मेसोपोटेमिया, इजिप्त आणि नेपोलियन काळातील वस्‍तू येथे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT