Mohan Bhagwat US Visit Controversy pudhari
आंतरराष्ट्रीय

Mohan Bhagwat US Visit Controversy: भागवतांच्या अमेरिका भेटीला कडाडून विरोध, USCIRF ची RSS सदस्यांवर बंदी घालण्याची मागणी

Anirudha Sankpal

Mohan Bhagwat US Visit Controversy: युएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजीअस फ्रीडम अर्थात USCIRF यांनी RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या प्रस्तावित अमेरिका भेटीला कडाडून विरोध केला आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे या महिन्यात न्यूयॉर्कला भेट देणार आहेत.

दरम्यान, USCIRF च्या एका सदस्याने एक्सवर पोस्ट करून स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. या स्टेटमेंटमध्ये अमेरिकेच्या सरकारने RSS सदस्य जे धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे दोषी आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं म्हणण्यात आलं आहे.

काय म्हणाले USCIRF प्रमुख?

USCIRF चे प्रमुख असिफ महमूद म्हणाले की, 'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. भारताच्या या प्रमुख संघटनेशी संबंधित असलेल्या अनेक संघटनांनी अल्पसंख्यांकावर हल्ले केले आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग आहे. यात ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचा देखील समावेश आहे. आता आरएसएस नेते मोहन भागवत अमेरिकेच्या भेटीवर येण्याची योजाना आखत आहेत.'

USCIRF चेच अजून एक सदस्य जेन मिल्स म्हणाले की, 'आरएसएस नेते जरी ते भारतीय सरकारशी संबंधित असले तरी त्यांना उच्च स्तरावरील बैठका आणि राजनैतिक आदर गेण्यात येऊ नये. याव्यतिरिक्त युएसजीने आरएसएसच्या सदस्यांवर बंदी घालण्यावर लक्ष केंद्रित करावं.'

USCIRF एजन्सी काय आहे?

विशेष म्हणजे ही USCIRF एजन्सी ही अमेरिकन विधिमंडळाची एक शाखा आहे जी १९९८ मध्ये तयार करण्यात आली होती. यातील सदस्यांची नियुक्ती ही राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ सिनेटर करतात. जरी असं असलं तरी ही शाखा अमेरिकेच्या सरकापेक्ष स्वतंत्र पद्धतीने काम करते.

यापूर्वी देखील या एजन्सीने आरएसएस आणि गुप्तचर संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या एजन्सीने अमेरिकेच्या सरकारला धार्मिक स्वातंत्र्य ही गोष्ट सुरक्षा सहकार्य आणि द्वीपक्षीय व्यापार धोरणांसोबत जोडण्याची देखील मागणी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचं मत

असं असलं तरी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या USCIRF च्या ताज्या मागणीबाबत अधिकृत असं कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र गेल्या वर्षी या एजन्सीचा वार्षिक अहवाल आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने, 'USCIRF अध्यक्ष हे एखाद दुसऱ्या घटनेचा चुकीचा अर्थ काढत आहेत. त्यावरून ते भारताच्या बहुविविध संस्कृती असलेल्या समाजाबाबत, प्रतिमा मलीन करणारे वक्तव्य करणे अन्यायकारक आहे. धार्मिक स्वातंत्र्याबाबतची ही खरोखरची काळजी नसून एक मुद्दाम राबलेला अजेंडा वाटतो आहे.' अशी प्रतिक्रिया दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT