Microsoft Shut Down AI Chatbot: एका सबस्क्रीप्शन बेस AI चॅटबॉटने जगभरातील जवळपास १२ हजार मायक्रॉसॉफ्टचे अकाऊंट हॅक करून त्यात घुसखोरी केली होती. मायक्रोसॉफ्टने आता हा चॅटबॉट बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगितलं.
EvilTokens या प्लॅटफॉर्म हा सर्वात आधी फेब्रुवारी महिन्यात टेलेग्रामवर आला होता. हा प्लॅटफॉर्मने सुरूवातीला १५०० डॉलर फी चार्ज केली होती. त्यानंतर त्याने महिन्याला ५०० डॉलर इतकी फी ठेवली होती. EvilTokens एकाच ठिकाणी एखादे ईमेल अकाऊंट हॅक करण्याची सेवा मोठ्या प्रमाणात पुरवत होता.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार एकदा का एखाद्याच्या ईमेल अकाऊंटमध्ये घुसल्यानंतर हा EvilTokens प्लॅटफॉर्म ग्राहकाला संबंधिताच्या इनबॉक्समध्ये घुसून कर्मचाऱ्यांचे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण मिळवत होता.
मायक्रोसॉफ्ट म्हणाले की, 'थोडक्यात सांगायचं झालं तर AI हे काही फक्त सायबर गुन्हेगारांना फक्त चांगला मेसेज लिहून देत नव्हते तर तो त्यांना कोणाला टार्गेट करायचं आहे. कोणाची नक्कल करायची आहे आणि जास्तीजास्त पैसा काढून घेण्यासाठी कोणाचे कोणते रिलेशनशिप जास्त exploit करायचे यासाठी देखील मदत करत होता.'
मायक्रोसॉफ्टने सांगितलं की हा AI चॅटबॉट काही विशिष्ट देशांमधील अकाऊंटच टार्गेट करत होता. जे देश वेगाने प्रगती करत आहेत आणि जागतिक स्तरावर जास्त पोहच ठेवतात त्यांना टार्गेट केलं जात होतं. मायक्रोसॉफ्टला असं दिसून आलं आहे की या AI चॅटबॉटचे सर्वाधिक पीडित हे अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, भारत आणि फ्रान्स या देशातील होते.
या चॅटबॉटने आर्थिक सेवा देणाऱ्या, रिअल इस्टेट, उच्च शिक्षण, आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं. आता पार्टनर्ससोबत काम करून मायक्रोसॉफ्टने ५० वेबसाईट सीज केल्या आहेत. त्याचबरोबर या AI च्या इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करणारे १५० पेक्षा जास्त अतिरिक्त डोमेन डिसेबल केले आहेत. या प्रकरणी युकेमध्ये कोन सायबर गुन्हेगारांना संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. ते EvilTokens च्या ऑपरेशनशी संबंधित आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे.