Microsoft: मायक्रोसॉफ्टची नवीन एआय चिप लाँच

गुगल आणि ॲमेझॉनला देणार तगडी टक्कर
Microsoft
Microsoft: मायक्रोसॉफ्टची नवीन एआय चिप लाँचPudhari
Published on
Updated on

वॉशिंग्टन : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) शर्यतीत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने आपली नवीन चरळर 200 ही ‌‘ॲक्सिलरेटर चिप‌’ सादर केली आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिप गुगल आणि ॲमेझॉनच्या सध्याच्या हार्डवेअरपेक्षा तिप्पट अधिक शक्तिशाली आहे. या चिपचा मुख्य वापर एआय ‌‘ट्रेनिंग‌’साठी न होता ‌‘इन्फरन्स‌’ साठी केला जाईल. म्हणजेच, ही चिप एआय सिस्टीमला वेगाने अंदाज वर्तवण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि नव्या डेटावर आधारित उत्तरे तयार करण्यासाठी मदत करेल.

मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड आणि एआय विभागाचे उपाध्यक्ष स्कॉट गुथरी यांनी सांगितले की, या चिपची क्षमता 10 पेटाफ्लॉप्सपेक्षा जास्त आहे. सुपरकंप्युटिंगच्या जगात ही कामगिरी अत्यंत उच्च दर्जाची मानली जाते. ही चिप ‌‘4-बिट प्रिसिजन‌’ तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे एआय मॉडेल्स अत्यंत वेगाने आणि ऊर्जा कार्यक्षम पद्धतीने काम करू शकतात. मायक्रोसॉफ्टने आधीच आपल्या अमेरिकेतील मध्यवर्ती डेटा सेंटर्समध्ये चरळर 200 तैनात करण्यास सुरुवात केली आहे. या चिपचा वापर पुढील क्षेत्रांत केला जाईल : मायक्रोसॉफ्ट 365 को-पायलट : वापरकत्र्यांना अधिक वेगवान एआय अनुभव देण्यासाठी. ॲझ्युअर : मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड प्लॅटफॉर्मद्वारे इतर कंपन्यांनाही ही पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. पुढील पिढीचे मॉडेल्स : नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल्स अधिक प्रगत करण्यासाठी आणि सिंथेटिक डेटा तयार करण्यासाठी याचा वापर होईल.

सध्या ही चिप केवळ मायक्रोसॉफ्टच्या स्वतःच्या सेवांसाठी (जसे की को-पायलट) वापरली जात असली, तरी भविष्यात ती ॲझ्युअर क्लाऊडच्या माध्यमातून इतर कंपन्यांसाठीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‌‘आजची सर्वात मोठी एआय मॉडेल्स चरळर 200 वर अत्यंत सहजतेने चालू शकतात आणि भविष्यातील अधिक मोठ्या मॉडेल्ससाठी देखील यात पुरेशी क्षमता आहे,‌’ असा विश्वास स्कॉट गुथरी यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news