Malacca Strait Disruptions Impact pudhari
आंतरराष्ट्रीय

Malacca Strait News: होर्मुझ झालं आता मलक्का... अमेरिकेनं इथं नाकाबंदी केली तर भारतासाठी होणार मोठी अडचण?

Malacca Strait Disruptions Impact: आता अमेरिकेने इंडोनेशियाच्या सोबतीने मलक्का सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.

Anirudha Sankpal

why malacca strait is important for india

इराण इस्त्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धात इराणजवळील होर्मुझ ही सामुद्रधुनी कळीचा मुद्दा ठरली होती. इराणने अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर ही सामुद्रधुनी वाहतुकीस बंद केली होती. त्यामुळं जगात तेल संकट निर्माण झालं. आता अमेरिकेने इंडोनेशियाच्या सोबतीने मलक्का सामुद्रधुनीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ही सामुद्रधुनी जगाच्या व्यापाराची मुख्य वाहिनी मानली जाते.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार मलक्का सामुद्रधुनीतून प्रत्येक वर्षी ९० हजार जहाजे जातात. ही सामुद्रधुनी हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडते. या मार्गाने कच्च्या तेलापासून अनेक प्रकारच्या वस्तूंची वाहतूक होते. जगाच्या समुद्री व्यापाराच्या ४० टक्के व्यापार हा या महत्वाच्या समुद्री मार्गाने होतो. अशातच आता भारताच्या शेजारील सलक्का खाडीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोकस केला आहे. जर मलक्काची नाकाबंदी झाली तर भारतावर याचा काय प्रभाव पडणार आहे?

अमेरिका - इंडोनेशिया डील

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार नुकतेच अमेरिका आणि इंडोनेशिया यांनी एक मोठा संरक्षण करार केला आहे. त्यानुसार अमेरिकेच्या लष्करी वायू सेनेला त्यांच्या ऑपरेशन्ससाठी इंडोनेशियाच्या एअरस्पेसपर्यंतची पोहोच मिळाली आहे. याद्वारे आता आमेरिका मलक्का खाडीतील हालचालींवर लक्ष ठेवू शकणार आहे.

अमेरिका - इंडोनेशिया यांच्यात जो संरक्षण करार झाला आहे त्याची टायमिंग सध्या चर्चेत आहे. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ होर्मुझची नाकाबंदी देखील कडक केली आहे. अमेरिका पॅसिफिक महासागरातील रणनितीवर चालत आहे. आता ते होर्मुझबरोबरच जगाच्या इतर चोक पॉईंटवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळं हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

कुठं आहे मलक्का स्ट्रेट?

मलक्का स्ट्रेट भारताच्या अगदी जवळ आहे. अंदमान समुद्र ( हिंदी महासागर) आणि दक्षिण चीन महासागर यांना जोडणारा जो समुद्री मार्ग आहे तो म्हणजा मलक्का स्ट्रेट. हा मार्ग इंडोनेशियाच्या बेटांच्या मधे आहे. पश्चिम सुमात्रा आणि पूर्वेकडे मलेशिया आणि थायलंड यांच्या मधून हा मार्ग जातो. जवळपास हा मार्ग ६५ हजार स्क्वेअर किलोमीटर भागात पसरला आहे.

हा समुद्री मार्ग ८०० किलोमीटर लांब असून त्याची रूंदी ही फक्त ६५ किलोमीटरच आहे. याचे नाव मलय किनाऱ्यावरील व्यापारी बेट मेलाका (पूर्वीचे मलक्का) या नावावरून पडलं आहे. १६ व्या आणि १७ व्या शतकात या समुद्री मार्गाचे विशेष महत्व होते.

हिंदी महासागर आणि दक्षि चीन सागर यांच्यामधला हा कॉन्टॅक्ट पॉईंट आहे. त्यामुळं मलक्का भारत आणि चीन यांच्यातील सर्वात छोटा समुद्री मार्ग आहे. त्यामुळंच हा जगातील एक सर्वात व्यस्त समुद्री मार्गांपैकी एक आहे. मलक्का स्ट्रेट हे फिलिप चॅनलजवळ फक्त ३ किलोमीटर रूंद आहे.

भारतासाठी एवढा महत्वाचा का?

भारताचा समुद्रामार्गे होणारा व्यापार हा जवळपास ६० टक्के आहे. त्याचबरोबर एलएनजी (लिक्विफाईड नॅच्युरल गॅस) आयात करण्यासाठी मलक्का स्ट्रेट हा अत्यंत महत्वाचा आहे. याचबरोबर मलक्काच्या जवळच भारताचा नवा रणनैतिक कमांड पोस्ट अंदमान निकोबार कमांड सेंटर देखील आहे. भारत निकोबार द्वीप समुहात सिंगापूर सारखे एक स्ट्रॅटेजिक शहर वसवणार आहे. हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट आहे. तो गलाथिया खाडीच्या जवळ आहे.

इथे लष्करी आणि नागरी दोन्हीसाठी स्ट्रॅटेजिक एअरपोर्ट देखील आहे. इथं एक शहर वसवण्यात येणार आहे. हे शहर जवळपास १६६ स्क्वेअर किलोमीटरच्या परिघात पसरलेलं असेल. यामुळं बंगालच्या खाडीपासून हिंदी महासागराच्या भागावर भारताचे नियंत्रण येणार आहे.

भारताची मलक्का स्ट्रेटमध्ये पेट्रोलिंग

२ - ४ सप्टेंबर २०२५ मध्ये सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉन्ग तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामुळं सुमद्री सुरक्षा एक नव्या उंचीवर पोहचली. पहिल्यांदाच सिंगापूरने मलक्का जल कराराअंतर्गत भारताच्या भूमिकेला हिरवा कंदील दाखवत या क्षेत्रातील सामरिक नाते अजून घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

वाढत्या समुद्री आव्हानांमध्ये हे पाऊल फक्त सुरक्षेसाठी नाही तर विश्वासाचं नातं देखील मजबूत करणारा आहे. सिंगापूरने मलक्का स्ट्रेटमध्ये पेट्रोलिंग करण्याच्या भारताच्या भूमिकेचा औपचारिक स्विकार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT