Donald Trump Joe Biden US Presidential Debate
'प्रेसिडेन्शियल डिबेट'च्या निमित्ताने ज्यो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प आमने- सामने आले. CNN
आंतरराष्ट्रीय

Trump Vs Biden | 'बायडेन 'मंच्युरियन', त्यांना चीन पैसा देतं'; ट्रम्प यांचा आरोप

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्याआधी झालेल्या पहिल्या 'प्रेसिडेन्शियल डिबेट'च्या निमित्ताने विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आमने- सामने आले. उभय नेत्यांमध्ये अर्थव्यवस्था, हवामान, गर्भपात, इस्राएल, युक्रेन, अफगाणिस्तानसह अनेक मुद्यांवरुन जोरदार वादावादी झाली. त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. हे डिबेट सीएनएनने त्यांच्या अटलांटा येथील मुख्यालयात आयोजित केले होते.

ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर अर्थव्यवस्था आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या कामगिरीवरुन जोरदार हल्लाबोल केला, तर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारी दोषारोप आणि २०२० ची निवडणूक उलथून टाकण्याच्या कथित प्रयत्न केल्याचा आरोप केला.

बायडेन "मंच्युरियन उमेदवार"; ट्रम्प यांचा गंभीर आरोप

ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आणि त्यांनी त्यांचा उल्लेख "मंच्युरियन उमेदवार" म्हणून केला. ट्रम्प पुढे म्हणाले की अमेरिकेत सध्या इतिहासातील सर्वात मोठी तूट आहे. चीनशी आमची सर्वात मोठी तूट आहे. त्यांना चीनकडून मोबदला मिळतो. ते मंच्युरियन उमेदवार आहे. त्यांना चीनकडून पैसे मिळतो," असे ट्रम्प म्हणाले.

'देशात दहशतवादी येत आहेत'

"एक देश म्हणून आमचा आता आदर राहिलेला नाही आणि ते आमच्या नेतृत्वाचा आदर करत नाहीत आणि आम्ही तिसऱ्या जगातील देशासारखे आहोत," असे ट्रम्प म्हणाले. "आमच्याकडे एकच सीमा आहे; जी जगातील सर्वात धोकादायक ठिकाण आहे. बायडेन यांनी ती खुली केली आणि हे मारेकरी आपल्या देशात येत आहेत. महिलांवर बलात्कार आणि हत्या करत आहेत. ही एक भयानक गोष्ट आहे." असा घणाघात ट्रम्प यांनी केला. "आमच्या देशात सध्या जगभरातील सर्वात अधिक दहशतवादी येत आहेत. ते मध्यपूर्वेतून आणि इतर ठिकाणांहून येत आहेत." असाही दावा त्यांनी केला.

'रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काहीच केले नाही'

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी बायडेन यांनी काहीही केलेले नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प हे सर्वात वाईट व्यक्ती- बायडेन

बायडेन प्रत्युत्तर देताना म्हणाले, "हा माणूस (ट्रम्प) माझ्यापेक्षा ३ वर्षांनी लहान आहे आणि तो अधिक सक्षम नाही. तो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट आहे." या व्यासपीठावरील एकमेव व्यक्ती (ट्रम्प) जो दोषी ठरलेला अपराधी आहे.''

एकमेकांना आव्हान देण्याची दुसरी वेळ

२०२० मध्ये ट्रम्प पराभूत झाल्यानंतर बायडेन आणि ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान एकमेकांना आव्हान देण्याची ही दुसरी वेळ आहे. ८१ वर्षीय बायडेन आणि त्यांचे ७८ वर्षीय प्रतिस्पर्धी ट्रम्प यांनी टीव्हीवरील ९० मिनिटांच्या डिबेटमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप केले.

SCROLL FOR NEXT