Jensen Huang Resignation Twist : एनवीडियाचे सीईओ जेनसन हुआंग यांनी त्यांचे कथित तीन अफेअर्स चर्चेत आल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांचा हा निर्णय रूचला नसल्याचे मत कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी केला आहे. एनवीडिया कंपनीत झालेल्या अंतर्गत रिव्ह्यूमध्ये १६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी जेनसन यांनी पुन्हा पदग्रहण करावे अशी मागणी केली आहे.
एनवीडिया इंजिनिअरने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ६३ वर्षाचे सह संस्थापक जेनसन यांचे अनेक एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर्स उजेडात आल्याने राजीनामा दिला होता त्याना पुन्हा परत कंपनीत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. एका इंजिनिअयरने, 'जर तुम्हाला तुमच्या मोहीमेवर विश्वास असेल तर बॉसला पुन्हा आणा.' अशी कमेंट केली असून दुसऱ्या अज्ञात इंजिनिअयरने, 'आपण सर्व माणसं आहोत आणि आपण सर्व चुका करतो. जेनसन यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळं त्यांना अजून एक संधी मिळायला हवी.'
जेनसन यांना मिळणारा पाठिंबा हा फक्त एका अंतर्गत सजेशन बॉक्सपुरता मर्यादित नाहीये. एका कर्मचाऱ्याने संपूर्ण कंपनीला एक इमेल पाठवला आणि हुआंग यांच्या एक्झिटबाबत पूर्ण पारदर्शकता बाळगली पाहिजे अशी मागणी केली. त्याने माझा जेनसन यांना पाठिंबा आहे असं देखील तो कर्मचारी म्हणाला, तो पुढे लिहितो की, जर अमेरिकेने ज्या माणसाने भविष्य उभारण्यासाठी मदत केली त्याला गमावले तर आपले हे जग जेनसन हुआंग यांच्यासाठी पात्रच नव्हते.'
जेनसन हुआंग यांनी १९९३ मध्ये एनवीडियाची स्थापना केली होती. त्यांनी रविवारी सर्व कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहलं. त्या त्यांनी 'मी माझ्या पत्नीसोबत एकनिष्ठ राहिलो नाही. त्यामुळं कोणतंही कारण देत नाही.' असे लिहित राजीनामा दिला होता. त्यांनी हा राजीनामा चायनिज महिला गुप्तहेरासोबत विवाहबाह्य संबंधांचे आरोप झाल्यानंतर दिला आहे.
जेनसन यांनी राजीनामा दिला असल्याची घोषणा कंपनीच्या बोर्डाने गुरूवारी सकाळी केली. त्यानंतर जेनसन यांच्यावर ऑफिसमधील अजून एका महिलेशी विवाह बाह्य संबंध असल्याचा आरोप झाला. यावेळी याबाबतचा थेट अहवाल आला होता. त्या महिला कर्मचाऱ्याने याबाबत अजून वक्तव्य केलेलं नाही. रॉयटर्सने जेनसन यांचे एनवीडियामधील अजून एका महिला कर्मचाऱ्यासोबत अफेअर असल्याचे वृत्त दिले. जेनसन यांनी याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.