दहशतवादी मसूद अझर Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Jaish-e-Mohammed : मसूद अझहरने सुरू केला महिलांसाठी ऑनलाईन 'जिहादी कोर्स', पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याची पत्नी देतेय प्रशिक्षण

आयसीसी, हमास आणि एलटीटीईंप्रमाणे जैशही आत्‍मघाती हल्‍ल्‍यांसाठी महिलांचा वापर करणार

पुढारी वृत्तसेवा

Jaish online jihadi course: पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM)ने महिलांसाठी जमात उल-मुमिनात हे स्‍वतंत्र युनिट सुरू केले आहे. येथील भरती वाढवी याबरोबरच आर्थिक पाठबळ मिळावे, यासाठी ऑनलाईन जिहादी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, दहशतवादी संघटनेत भरती होणाऱ्या महिलांना भारताच्या ऑपरेशन सिंधूरदरम्यान मारला गेलेला जैश-ए-मोहम्मदचा कमांडर युसूफ अझहरची पत्नी आणि जम्मू–काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा म्‍होरक्‍या मसूद अझरच्या बहिणी सादिया अझहर प्रशिक्षण देणार आहे.

पाकिस्‍तानी चलनातील ५०० रुपये फी

'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार 'तुफ़त अल-मुमिनात' हा ऑनलाईन जिहादी प्रशिक्षण कोर्स धार्मिक आणि जिहाद-केंद्रित आहे. त्‍याचबरोबर दहशतवादी संघटनेत महिलांची भरती वाढविवण्‍यासाठॅ आहे. ८ नोव्हेंबरपासून दररोज सुमारे ४० मिनिटांचे ऑनलाइन प्रशिक्षण जैशचा म्‍होरक्‍या मसूद अझहरच्या बहिणी सादिया अझहर आणि समायरा अझहर देणार आहेत. प्रत्येक सहभागीला फी म्हणून पाकिस्‍तानी चलनातील ५००रुपये देण्यास सांगितले जात आहे.

जैशची महिलांसाठी स्‍वतंत्र युनिट 'जमात उल-मुमिनात'

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्‍होरक्‍या मसूद अझहरने ८ ऑक्टोबर रोजी बहावलपूरमधील मरकझ उस्मान-ओ-अली येथे महिला युनिट जमात उल-मुमिनात सुरु केले आहे. यानंतर काही दिवसांत महिलांसाठी ऑनलाईन 'जिहादी कोर्स'चे नियोजन करण्यात आले आहे. रविवार, १९ ऑक्टोबर रोजी जैशने पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे दुख्तरान-ए-इस्लाम नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा उद्देश जमात उल-मुमिनातसाठी महिलांना एकत्र आणणे हा होता.

आयसीसी, हमासप्रमाणे जैशमध्येही महिलांच्या स्वतंत्र युनिट तयार करणार

पाकिस्तानमधील सामाजिक नियमांमुळे महिलांना खुले प्रशिक्षण देणे शक्य नाही. म्हणूनच जैश-ए-मोहम्मद आता महिला भरती आणि प्रशिक्षणासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. आयएसआयएस, हमास आणि एलटीटीई अशा दहशतवादी संघटनांसारखेच जैश-ए-मोहम्मद आता आत्मघाती हल्ल्यांसाठी महिलांना दहशतवादी संघटनेत सहभागी करण्याचा प्रयत्नात असल्‍याचे सूत्रांनी म्हटले आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना लक्ष्य

या ऑनलाईन कोर्ससाठी ५०० रुपये फी आकारली जाणार आहे. पाकिस्तानमधील अधिकारी असा दावा करतात की जैश फायनांशिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या नियमांचे पालन करते; मात्र आता हीच संघटना नवीन नावांनी निधी गोळा करत आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर युसूफ अझहर भारताच्या ऑपरेशन सिंधूरदरम्यान मारला गेला होता. त्याची पत्नी आणि मसूद अझहरची धाकटी बहीण सादिया अझहर ही महिलांना प्रशिक्षण देणार आहे. जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जैशकडून त्यांच्या कमांडरांच्या पत्नी आणि बहावलपूर, कराची, मुजफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मानसेरा येथील त्यांच्या केंद्रांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांवर भरतीचे प्रयत्न सुरू आहेत.

महिला सदस्यांचा वापर - रसद आणि प्रचारासाठी

महिला सदस्यांचा वापर सुरक्षा तपासणीतून सुटका करून रसद पूरवठा किंवा प्रचारात्मक कार्यासाठी केला जाऊ शकतो, हे पहलगाम हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हेरले आहे. यातूनच आता थेट महिलांना दहशतवादी संघटनेत समाविष्ट केले जात आहे. पारंपरिकदृष्ट्या देवबंदी-पृष्ठभूमीची असलेली जैश-ए-मोहम्मद महिलांना सशस्त्र जिहादीत भाग घेण्यास मनाई करत होती. मात्र गोपनीय महिती घेण्‍यासाठी मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तल्हा अल-सैफ यांनी अलीकडेच संघटनेच्या कारवायांमध्ये महिलांचा सहभाग वाढवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT