Italy Protest Law Parents Penalty pudhari
आंतरराष्ट्रीय

Italy Protest Law Parents Penalty: मुलांनी 'दंगा' केला तर पालकांना शिक्षा... आंदोलन 'शांत' करण्यासाठी मेलोनींचा नवा कायदा

giorgia meloni new security law : नव्या कायद्याअंतर्गत पोलिसांना अल्पवयीन मुलांविरूद्ध कारवाई करायला अजून जास्त पॉवर देण्यात आली आहे.

Anirudha Sankpal

Meloni New Security Law: इटलीच्या पंतप्रधान गॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने नवीन सुरक्षा कायद्याला मंजुरी दिली आहे. जे आंदोलक हिंसक आंदोलन करतील त्यांच्याविरूद्ध आता कडक शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत पोलिसांना अल्पवयीन मुलांविरूद्ध कारवाई करायला अजून जास्त पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर जी मुले सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतील त्यांच्या पालकांकडून त्याची नुकासन भरपाई वसूल करण्यात येणार आहे.

मिलानमध्ये नुकतेच हिंसक आंदोलन झाले होते. इटलीच्या इतर शहरांमध्ये देखील आठवड्याच्या शेवटी हिंसक आंदोलन झाली असून जवळपास १०० पोलीस यात जखमी झाले आहेत. आंदोलकांनी दुकानांची लूट केली तसेच दुकानांवर दगडफेक करत त्याचे नुकसान देखील केलं आहे. त्यामुळे मिलान शहरात तरी मोठं नुकसान झालं आहे.

यानंतर पंतप्रधान मेलोनी यांनी आंदोलनादरम्यान करण्यात येणारी हिंसा ही सरकार खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, 'आपण हिंसाचाराचे फोटो पाहिले आहेत. मिलान आणि इटलीमधील इतर शहरांमध्ये वीकएन्डला जे झालं त्यानं धक्का बसला आहे. दुकाने लूटण्यात आली असून त्यांचे मोठे नुकासन करण्यात आलं आहे. सुरक्षा रक्षकांवर देखील हल्ला करण्यात आला आहे. हे कदापी मान्य असणार नाही. याचे कोणीही समर्थन करणार नाही.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT