नवी दिल्ली : गाजामध्ये इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्या मध्ये हमासचा पुर्व प्रमूख याह्या सिनवारचा भाऊ मुहम्मद सिनवार व त्याचा मुलगा ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीच्या आधारे या दोघांचे शव खान युनूस येथील एका भुयारात सापडली आहेत. मुहम्मद सिनवार याच्यासोबत त्याचे दहा साथीदारांचे मृतदेहसुद्धा मिळाले आहेत.
गेल्यावर्षी इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार याचा मृत्यू झाला होता. सिनवार याने पहिल्यांदा इस्त्रायलवर हल्ला केला होता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर इस्त्रायल व हमासमध्ये युद्ध सुरु झाले होते ते आजतागायत सुरु आहे.
इस्त्रायलच्या सैन्याने एका युरोपिअन रुग्णालयाच्या खाली असलेल्या कमांड सेंटरला निशाना बनवले ज्याठिकाणी मुहम्मद सिनवार लपून बसला होता. या हल्ल्यात तो ठार झाला असल्याची शंका आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री केटस् यांचे म्हणने आहे की मुहम्मद सिनवार मारला गेला आहे.
तर हमास यांच्या म्हणन्यानुसार या हल्ल्यामध्ये १६ जण ठार झाले आहेत. तर ७० लोक जखमी झाले आहेत. पण मुहम्मद सिनवार हे यामध्ये सहभागी होते की नाही याची खात्री पटलेली नाही. मुहम्मद सिनवार यांच्यामुळेच हे युद्ध अजून सुरु आहे असे मानले जाते. कारण युद्धविराम लागु करण्याच मुहम्मद सिनवार अडथळा ठरत हाेता.