Hamas chief Yahya Sinwar : हमासचा 'मास्टरमाइंड' याह्या सिनवार याचा इस्त्राईलकडून खात्मा!

इस्रायलच्या लष्करी हल्ल्यात ठार
Hamas chief Yahya Sinwar
हमासचा मास्टरमाइंड याह्या सिनवार याचा इस्त्राईलकडून खात्मा!Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सरु होऊन एक वर्ष उलटून गेले. अलीकडच्या काळामध्ये इस्रायलने गाझामध्ये अनेक हल्ले केले आहेत. इस्रायली लष्कराने गुरुवारी (दि.17) हमासचे अड्डे हेरुन त्यावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हमासचा प्रमुख मास्टरमाइंड याह्या सिनवार ( Hamas chief Yahya Sinwar ) याचा खात्मा झाल्याची माहिती इस्त्राईलने सोशल मिडीया माध्यम एक्सवर दिली आहे. मात्र, हमासनेही याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

Hamas chief Yahya Sinwar| कोण आहे याह्या सिनवार ?

याह्या सिनवार हा एक कुख्यात आरोपी होता. त्यांने त्याच्या जिवनातील २२ वर्षे तुरुंगात घालवली आहेत. सिनवार हा १९८८ ते २०११ कालावधीत इस्रायलच्या तुरुंगात होता. त्यानंतर तो काही काळ अज्ञातवासात गेला होता. तुरुंगात असताना त्याचा प्रभाव इतर कैद्यांवर झाला होता. यामध्ये गैरवर्तन करणं, दादागिरी करणं, हेराफेरी करणं हे त्याच्या स्वभावात होतं. त्यांने तुरुंगामध्ये १६०० कैद्यांसोबत उपोषण केले होते. तुरुगांतून सुटल्यानंतर सिनवारला गाझा पट्टीतल्या हमासचा राजकीय सदस्यपद देण्यात आले होते. २०१५ मध्ये सिनवारचं नाव जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत आलं. २०१७ पासून त्याने हमासचा म्होरक्या म्हणून काम केलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news