आंतरराष्ट्रीय

Israel Hamas war : इस्रायल-हमास युद्धात किमान ४० बालके ठार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील किमान ४० बालके ठार झाल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. असे वृत्त  इस्रायल येथील एका वृत्त वाहिनीने दिले आहे. काही सैनिकांचे म्हणणे आहे की त्या बालकांचे शिर कापलेले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला  गोळ्या घालून ठार करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे ४० लहान मुलांना बंकरमधून बाहेर काढण्यात आले आहे. (Israel Hamas War)

इस्रायल आणि हमास युद्धाचा आज (दि.११) पाचवा दिवस आहे. दहशतवादी संघटना हमासने शनिवारी, ७ ऑक्‍टोबर रोजी गाझा येथून इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलमधील १५० हून अधिक लोकांना ओलीस ठेवले होते. इस्रायलच्‍या सैन्‍याने ( Israeli army ) गाझावरील प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत सुमारे १,७०७ ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्रायल सैन्‍याने अनेक मशिदींवर हल्लेही केले आहेत. या युध्दात इस्रायल आणि हमास यांची ३००० हून अधिक लोक ठार झाले आहेत. हजारो लोक जखमी झाले आहेत.

एका वृत्तवाहीनीशी बोलताना आयडीएफ मेजर जनरल इटाई वेरूव म्हणाले, "हे युद्ध नाही, हे युद्धभूमी नाही, हा एक नरसंहार आहे. लहान बालकांना, त्यांच्या कुटुंबियांना या दहशतवाद्यांनी कसे मारले आहे ते पाहा. पुढे बोलत असताना ते म्हणाले की,  "हे असे काहीतरी मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते."

इस्रायल आणि गाझा सीमेवर शनिवारी पहाटे नेमकं काय घडलं?

हमास आणि इस्‍लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी शनिवारी सकाळी गाझा पट्‍टीतून इस्‍त्रायलवर हजारो रॉकेट डागले. यानंतर दहशतवाद्यांनी अत्‍यंत भक्‍कम सुरक्षाकडे भेदत गाझा सीमेजवळील ज्यू वस्‍तीत घुसखोरी केली. नागरिक आणि सैनिकांवर अंदाधूंद गोळीबार केला. नागरिकांना ओलीस ठेवले. या घटनेचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहेत. काही दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे इस्रायलमध्ये प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला. गेल्‍या पाच दशकात प्रथमच इस्‍त्रालयवर एवढा मोठा आणि अभूतपूर्व हल्‍ला झाला आहे. या हल्‍ल्‍यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमास विरुद्ध युद्ध सुरु झाल्‍याचे जाहीर केले. तसेच पॅलेस्टिनींना याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिला.

Israel Hamas War : गाझा पट्टीचा वाद काय आहे?

गाझा पट्टी हा भाग पूर्वी पॅलेस्टाईनचा भाग होता आणि येथे स्वयंशासन होते. पण १९६७ला झालेल्या अरब-इस्राईल युद्धानंतर वेस्ट बँक, पूर्व जेरुजलेम या दोन भागांसह गाझा पट्टीही इस्राईलच्या नियंत्रणात आली. मिडटेरियन किनारपट्टीचा हा भाग आहे. गाझा पट्टीच्या सीमेला इजिप्त आणि इस्राईल येतात. गाझा पट्टीचा भूभाग ३६५ चौरस किलोमीटरचा आहे, म्हणजे जवळपास लखनऊ इतका हा भाग आहे.

इस्राईलची निर्मिती १९४८ झाली. १९४८ला अरब-इस्राईल युद्ध झाले होते, त्यानंतर १९६७ पर्यंत हा भूभाग इजिप्तच्या ताब्यात होता.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू गाझा पट्टी हा भूभाग राहिला आहे. गाझा पट्टीवर आता जी निर्बंधांची स्थिती आहे, ती २००७पासून आहे. इस्राईल गाझा पट्टीची हवाईक्षेत्र आणि जमिनीवरील पाण्यावर पूर्ण नियंत्रण ठेऊन आहे. तसेच सीमेवर असणारे बहुतांश क्रॉसिंग पॉईंटही इस्राईलच्या ताब्यात आहेत. तर काही क्रॉसिंग पॉईंटवर इजिप्तचा ताबा आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT