Iran US Peace Talk Update PUDHARI
आंतरराष्ट्रीय

Iran US Peace Talk Update: अमेरिका - इराण चर्चेला इस्त्रायलचा मोडता पाय... जेडी वॅन्स 'बॅड न्यूज' म्हणत परतीच्या वाटेवर

Anirudha Sankpal

Iran US Peace Talk Update: पाकिस्तानात सुरू झालेली इराण-अमेरिका-इस्त्रायल शांती चर्चा ही औट घटकेची ठरली आहे. इराणने चर्चेत लेबनॉनचा समावेश झालाच पाहिजे असा आग्रह धरला होता. तर इस्त्रायल सातत्यानं लेबनॉनवर तीव्र हल्ले करत होतं. त्यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले सुरूच राहतील असं सांगितलं.

तिकडं पाकिस्तानात अमेरिकेचे राष्ट्रपती जेडी वॅन्स यांनी देखील इराणला न कळवताच मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानातून काढता पाय घेताना अमेरिका चांगल्या हेतूने चर्चा करण्यासाठी आले होती. मात्र इराण अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास तयार नाहीये. ही एक वाईट बातमी आहे असं सूचक वक्तव्य केलं होतं. यामुळं तुर्तास तरी पाकिस्तानातील शांती वार्ता औट घटकेतच फेल झाल्याचं दिसत आहे.

काय म्हणाले नेतान्याहू?

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी इराण सोबतचं युद्ध अजून सुरू राहणार आहे. अजून अनेक पावलं उचलणे बाकी आहे. असं वक्तव्य केले. दुसरीकडं त्यांनी लेबनॉनसोबत खऱ्या शांती कराराची इच्छा देखील व्यक्त केली. सध्याच्या घडीला इस्त्रायली सेना दक्षिण लेबनॉनमध्ये ड्रोन हल्ले करत आहेत.

लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये सरकारने इस्त्रायलसोबत चर्चा करण्याचा मोठा विरोध होत आहे. लोक इस्त्रायली प्रशासनाशी चर्चा करण्याची निंदा करत असून त्याचा विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. हा विरोध पाहून पंतप्रधान नवाफ सलाम यांनी आपला आमेरिका दौरा देखील रद्द केला आहे.

जेडी वॅन्सही न सांगता मायदेशी परतले?

दुसरीकडे पाकिस्तान मध्यस्थी करत असलेल्या इराण-अमेरिका चर्चेत देखील मोठी घडामोड घडली. सर्व चर्चेची मदार असलेले अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वॅन्स हे चर्चा फिसकटल्यानंतर लगचेच एअर फोर्स २ मध्ये बसून मायदेशी परतण्यासाठी रवाना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार वॅन्स हे सकाळी ७ वाजता विमानातून परतीच्या प्रवासाला लागले. त्यांनी मायदेशात परतत आहोत याची इराण कल्पना देखील दिली नाही. त्यांनी इस्लामाबाद सोडण्यापूर्वी अमेरिका इराणसोबत चांगल्या हेतून चर्चा वाटाघाटी करण्यासाठी आला होता. मात्र या वाटाघाटीत कोणतीही प्रगती झालेली नाही. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यात नकार दिला आहे.

ते म्हणाले, 'आम्ही इराण आमच्या अटी मान्य करेल अशी परिस्थिती निर्माण करू शकलो नाही. अमेरिकेने वाटाघाटीदरम्यान फारच लवचिक भूमिका घेतली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चांगल्या हेतूने चर्चा करण्याचे आणि उत्तम करार करण्याचे निर्देश दिले होते. आम्ही तसा प्रयत्न केला मात्र आम्ही या चर्चेत पुढचा टप्पा काही गाठू शकलो नाही.'

इराणचाही अमेरिकेसोबत चर्चा न करण्याचा निर्णय

अमेरिकेने अचानक चर्चेतून माघार घेत इराणला न कळवताच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर इराणने देखील आता अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार इराणने, अमेरिकेला या चर्चेची फक्त त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी गरज होती. ते इराणकडून युद्धभूमीवर पराभूत होऊनही त्यांच्या अपेक्षा कमी करण्यात अपयशी ठरले.'

मिळालेल्या माहितीनुसार IRGC मधील सूत्रांनी इराण अमेरिकेसोबत सध्याच्या घडीला कोणत्याही चर्चेच्या दुसऱ्या राऊंडसाठी तयारी करत नाहीये असं स्पष्ट केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT