Netanyahu On Ceasefire: लेबनॉनचा समावेश नाही.... नेतान्याहूंनी पाकिस्तानच्या शरीफांची केली गोची; इस्त्रायलचा वेगळाच प्लॅन?

Netanyahu On Ceasefire
Netanyahu On Ceasefirepudhari
Published on
Updated on

Netanyahu On Ceasefire: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इस्त्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरूद्ध दोन आठवड्यांचा सीजफायर करण्याचा निर्णयाचे समर्थन करतो असं वक्तव्य केलं. मात्र हे वक्तव्य करताना त्यांनी मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची चांगलीच गोची केली. त्यांनी या सीजफायरमध्ये नेबनॉनचा समावेश नाहीये असं सांगितलं.

Netanyahu On Ceasefire
US Iran proposal | पाकिस्तानचे दलालीचे धंदे!

अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा

आज नेतान्याहूंच्या कार्यालयाने अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केलं. त्यात, 'अमेरिकेच्या इराणकडे अण्वस्त्र, मिसाईल नसावेत तसेच अमेरिका, इस्त्रायल, इराणचे अरब शेजारी तसेच जगाला दहशतवादाचा धोका असू नये यासाठी अमेरिकेने केलेल्या प्रयत्नांना इस्त्रायलचा देखील पाठिंबा आहे.' असा उल्लेख केला आहे.

Netanyahu On Ceasefire
Iran Conflict | समुद्रात तुमची 'दादागिरी' चालणार नाही! इराणविरोधात भारत,पाकिस्‍तानसह १३५ देश एकवटले

सीजफायरबाबत संभ्रम

त्याचबरोबर या अधिकृत वक्तव्यात, 'अमेरिकेने इस्त्रायलला सांगितलं आहे की ते अमेरिका, इस्त्रायल आणि इस्त्रायलचे या भागातील सहकारी या सर्वांचे एकत्रित उद्दीष्ट आगामी वाटाघाटीत साध्य करण्यासाठी कटीबद्ध आहेत.' याचबरोबर या वक्तव्यात दोन आठवड्यांच्या या सीजफायरमध्ये लेबनॉनचा समावेश नाहीये असं देखील सांगितलं.

Netanyahu On Ceasefire
Pakistan controversy |'पाकिस्तानमधील ८० टक्के लोक 'गे' आणि २० टक्के ...' : कराचीतील ट्रान्सजेंडर हिना बलोच यांचा खळबळजनक दावा

शरीफ तोंडावर आपटले

पाकिस्तानची पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा सीजफायर सगळीकडं लागू करण्याबाबत अमेरिका, इराण आणि त्यांचे सहकारी देश सहमत झाले आहेत असं सांगितलं होत. त्यानंतर सीजफायरमध्ये लेबनॉनचा समावेश नाहीये असे वक्तव्य नेतान्याहू यांनी केलं आहे. त्यामुळं मोठं मोठं बोलणारे शरीफ तोंडावर आपटले आहेत.

Netanyahu On Ceasefire
Viral Video Pakistan: हसावे की रडावे! पाकचे उपपंतप्रधान स्वागताला गेले अन् इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांसमोरच पडले, पाहा Video

लेबनॉनमध्ये नरसंहार

लेबनॉनला मध्य पूर्व आशियातील युद्धात २ मार्च रोजी ओढण्यात आलं होत. ज्यावेळी हेजबुल्लाने इस्त्रायली शहरांच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडली त्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला करण्यास सुरूवात केली. हेजबुल्ला हा इराण समर्थित एक प्रॉक्सी गट आहे. त्यांनी आयतोल्ला खामेनी यांची हत्या झाल्यानंतर इस्त्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागली होती.

इराणने याला प्रत्युत्तर देताना लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक केला होता. या जीवघेण्या हल्यात जवळपास १५०० लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास १० लाख लोक विस्थापित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news