Iran US Negotiation Update pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Negotiation Update: इराण समृद्ध युरेनियम परदेशात हलवणार; होर्मुझ सात दिवसात खुलं.. वाटाघाटीची प्राथमिक फ्रेमवर्क तयार?

दावा केल्यानुसार या कराराची शाश्वतता आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी चीन संभाव्य गॅरेंटर आहे.

Anirudha Sankpal

Iran US Negotiation Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्याबाबतच्या वाटाघाटींची प्राथमिक फ्रेमवर्क तयार झाली आहे. त्यानुसार इराणने त्यांचे समृद्द युरेनियम तिसऱ्या देशात ठेवण्याचा प्रस्ताव असून होर्मुझ देखील सात दिवसात खुलं करण्याबाबत प्राथमिक सहमती झाली आहे. याबाबतचे वृत्त अल अरेबिया (Al Arabiya) च्या इंग्रजी वृत्तात देण्यात आली आहे.

चीन संभाव्य गॅरेंटर

या प्राथमिक ड्राफ्ट फ्रेमवर्क या न्यूज प्लॅटफॉर्मकडेच आहे. त्यात दावा केल्यानुसार या कराराची शाश्वतता आणि त्याची अंमलबजावणी होण्यासाठी चीन संभाव्य गॅरेंटर आहे. या प्रस्तावानुसार अमेरिका आणि तेहरान यांच्यात इस्तांबुल ऐवजी दोहा येथे थेट वाटाघाटी करण्यात येणार आहेत.

काय आहेत अटी शर्ती?

प्रस्तावित करारानुसार इराण आपल्या न्युक्लिअर प्रोग्राम आणि समुद्री दळणवळणाच्या सुरक्षेबाबतची जबाबदारी घेणार आहे. त्याच्या बदल्यात अमेरिकेने इराणवर लावलेले निर्बंध हटवावेत तसेच जो ब्लॉकेड लावला आहे आणि आर्थिक बंधने घातली आहेत ती देखील कमी करावीत अशा तरतूदी आहेत.

स्वतंत्र व्यवस्थेद्वारे पडताळणी

या फ्रेमवर्कमध्ये या अटी शर्तींचे पालन होत आहे का नाही याची स्वतंत्ररित्या खात्री करून घेण्याची व्यवस्था देखील निर्माण करण्यात यावी. ही पडताळणी व्यवस्था कराराच्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्यावर मुल्यपामन करेल. यात एकमेकांना कळवल्याशिवाय कोणताही बदल करता येणार नाही.

या स्वतंत्र वाद निवारण व्यवस्थेत मध्यस्थ आणि गॅरेंटर देशांचा देखील समावेश असेल. हे देश देखील होणारा विलंब आणि कराराचे उल्लंघन होत असेल तर त्यावर कार्यवाही करून नवा वाद किंवा लष्करी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT