Iran US Ceasefire Document pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Ceasefire Document: सीजफायर कागदपत्रात इराणनं केली मोठी चलाखी, अमेरिकेने मान्य केला 'तो' प्रस्ताव?

Anirudha Sankpal

Iran US Ceasefire Document: अमेरिका आणि इराणमध्ये अखेर १५ दिवसांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. या शस्त्रसंधीसाठी इराणने अमेरिकेसमोर १० मागण्यांचा प्रस्ताव ठेवला होता. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं हा प्रस्ताव मान्य केला आहे. या महत्वाच्या कागदपत्रात अमेरिकेने इराणचा समृद्ध युरेनियमचा मुद्दा मान्य करावा अशी मागणी होती.

इराणची चलाखी की नजरचूक?

दरम्यान असोसिएट प्रेस या न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार इराणच्या समृद्ध युरेनियमचा मुद्दा हा फक्त फारसीमधून असलेल्या कागदपत्रात समाविष्ट करण्यात आला होता. मात्र हाच मुद्दा सीजफायरबाबतच्या १० मागण्या करणाऱ्या इंग्रजी अवृत्तीत गायब होता. या वृत्तात असं का करण्यात आलं आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

अमेरिकेने प्रस्ताव केला मान्य?

इस्टर्न टाईम झोननुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अटी शर्थी मान्य करून सीजफायर करण्यासाठी रात्री ८ वाजताची डेडलाईन दिली होती. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे सीजफायर जाहीर केलं. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

होर्मुझ देखील राहणार कार्यान्वित

डोनाल्ड ट्रम्प यांनी सीजफायर जाहीर केल्यानंतर इराणने देखील अमेरिकेसोबतचे दोन आठवड्यांचे सीजफायर जाहीर केलं. या काळात होर्मुझ सामुद्रधुनी जहाजांची ये-जा करण्यासाठी कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे असेही इराणने जाहीर केलं. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ट्विट केलं की जर इराणविरूद्धचे हल्ले थांबले तर आमची शक्तीशाली आर्मी देखील आपल्या बचावासाठी सुरू केलेली ऑपरेशन्स थांबवतील.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT