Mojtaba Khamenei Video pudhari
आंतरराष्ट्रीय

Mojtaba Khamenei Video: मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मोज्ताबा खामेनींच्या नव्या व्हिडिओने खळबळ; मोसाद तोंडावर पडलं?

Anirudha Sankpal

Mojtaba Khamenei Video: गेल्या काही दिवसांपासून इराणचे सुप्रीम लीडर मोज्ताबा खामेनी हे मरणाच्या दारात उभे आहेत. त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो अशा बातम्या अमेरिका आणि इराणच्या गोटातून येत होत्या. मात्र या सर्व दाव्यांना छेद देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. इराणची मेहर न्यूज एजन्सीने ८ ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

नव्या व्हिडिओने खळबळ

या व्हिडिओत मोज्ताबा यांची प्रकृती उत्तम असल्याचं दिसत आहे. ते काही लोकांसोबत बसले असून त्यांच्याशी ते चर्चा करताना दिसत आहेत. उपस्थित सर्व लोक मोज्ताबा यांचे बोलणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकत असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी हा व्हिडिओ कधी शूट केला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच या व्हिडिओत दिसतात ते मोज्ताबाच आहेत की नाही याची देखील अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही.

मात्र मोज्ताबा खामेनी यांच्या नव्या व्हिडिओमुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसुद पेझेशकीयन यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यात आयोतोल्ला मोज्ताबा खामेनींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सुतोवाच केलं होतं. यानंतर इराणचा सर्वोच्च नेता मरणाच्या दारात उभा आहे अशी चर्चा सुरू झाली. काही इस्त्रायली माध्यमांनी तर मोज्ताबा हे गंभीर असून कधीही मरू शकतात असे रिपोर्टिंग करणं सुरू केलं.

हल्ल्यात झाले गंभीर जखमी

जेरूसलेम पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, 'लवकरच मोज्ताबा यांच्या निधनाची बातमी आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं सांगून टाकलं होतं.

मोज्ताबा हे त्यांचे वडील आयोतुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च लीडर झाले होते. अमेरिका आणि इस्त्रायलने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्यात आयोतुल्ला अली खामेनींचे निधन झाले होते. त्यानंतर युद्धाला तोंड फुटलं होतं.

याच हल्ल्यात मोज्ताबा देखील जखमी झाल्याचे वृत्त आले होते. ते अत्यंत गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर मोज्ताबा कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. मोज्ताबा हे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एका सुरक्षित नेटवर्कद्वारे संपर्क करतात अशी माहिती आहे.

हा जुना व्हिडिओ आहे?

ज्यावेळी मोज्ताबा यांचा नवा व्हिडिओ बाहेर आला त्यानंतर अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सनी दावा केला की हा मोज्ताबा यांचा जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ इराणच्या माध्यमांनी दिशाभूल करण्यासाठी शेअर केल्याचा दावा करत आहेत.

युनायटेड एजंट न्युक्लिअर इराणचे धोरण संचालक जेसन ब्रोडोस्की यांनी ट्विट करत दावा केला की, 'हे फुटेज जुनं आहे. हे युद्धापूर्वीचं फुटेज आहे. हा व्हिडिओ सर्वात आधी मार्च महिन्यात पब्लिक झाला होता.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT