Ahmad Vahidi new IRGC commander file photo
आंतरराष्ट्रीय

Israel Attack Iran: कोण आहेत अहमद वहीदी? इराणच्या सेनेचे करणार नेतृत्व; खामेनेईंच्या हत्येचा बदला घेण्याची घेतली शपथ

Ahmad Vahidi new IRGC commander: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणमध्ये मोठ्या सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत.

मोहन कारंडे

Israel Attack Iran Ayatollah Ali Khamenei killed Ahmad Vahidi new IRGC commander

तेहरान: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणमध्ये मोठ्या सत्तांतराचे वारे वाहू लागले आहेत. या हल्ल्यात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे सर्वोच्च कमांडरही मारले गेले असून, त्यांच्या रिक्त जागी आता ब्रिगेडियर जनरल अहमद वहीदी यांची नवे कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत अहमद वहीदी?

३१ डिसेंबर २०२५ रोजी अहमद वहीदी यांची IRGC च्या उप-प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कमांडर-इन-चीफ हुसैन सलामी यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण सैन्याची धुरा वहीदी यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अहमद वहीदी हे यापूर्वी इराणचे गृहमंत्री आणि कुद्स फोर्सचे कमांडर म्हणून कार्यभार सांभाळला असल्याने, त्यांना युद्धाचा मोठा अनुभव आहे. आपल्या नियुक्तीनंतर त्यांनी खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

अहमद वाहिदी ईरानी यांचा जन्म जून १९५८ मध्ये झाला आहे. इराणच्या नॅशनल कौन्सिल ऑफ रेसिस्टन्सच्या माहितीनुसार, जन्मावेळी त्यांचे नाव अहमद शाह चेराघी असे ठेवण्यात आले होते. अहवालानुसार, १९८८ मध्ये आयआरजीसीच्या कुद्स फोर्सची स्थापना झाल्यानंतर ते त्याचे पहिले कमांडर बनले. ते महमूद अहमदीनेजाद यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणूनही कार्यरत होते. त्यानंतर ते शासनाच्या कार्यकुशलता परिषदचे सदस्य तसेच राजकीय, संरक्षण आणि सुरक्षा आयोगाचे प्रमुख होते. अहमद वाहिदी यांनी आयआरजीसीमध्ये कार्यरत असताना दहशतवादी कारवाया आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या अनेक छावण्यांची स्थापना केली.

खामेनेईंच्या मृत्यूवर अखेर शिक्कामोर्तब

सुरुवातीला इराणमधील सरकारी यंत्रणांनी खामेनी यांच्या मृत्यूच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मात्र, नंतर इराणचे अधिकृत सरकारी प्रसारक IRIB ने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात तेहरानमधील खामेनेई यांचे कार्यालय लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि इराणची सध्याची स्थिती काय?

इराण सरकारने देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर या मृत्यूची घोषणा करताना म्हटले की, "इराणच्या जनतेसाठी आपला देश पुन्हा ताब्यात घेण्याची हीच मोठी संधी आहे." इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही अधिकृत पुष्टी मिळण्यापूर्वीच या मोहिमेच्या यशाचे संकेत दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT