Iran Israel US Conflict: इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी आज अमेरिकेवर बोचरी टीका केली. त्यांनी अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत यू टर्न घेतल्यावरून अमेरिकेची खिल्ली उडवली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत अराघची यांना दावा केला की आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासन हे भारत आणि अतर देशांकडे रशियाकडून तेल खरेदी करावी यासाठी भीक मागत आहे. यापर्वी अमेरिकेनं भारतासह अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर टॅरिफ लावत दबाव टाकला होता.
इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'अमेरिका अनेक महिने भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून धमकावत होता. इराणसोबतच्या दोन आठवड्याच्या युद्धातच व्हाईट हाऊस आता भारतासह जगाकडं रशियाकडून तेल खरेदी करावी म्हणून भीक मागत आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपच्या देशांना इराणविरूद्धच्या अनधिकृत युद्धाला पाठिंबा दिल्याबद्दल देखील टीका केली. अराघची म्हणतात की या युरोपीय देशांना आशा आहे की याच्या बदल्यात अमेरिका रशियाविरूद्ध त्यांना पाठिंबा देईल. हे खूप दयनीय आहे.
दरम्यान, इराणने हार्मुझ सामुद्रधुनीतून भारताचा झेंडा असलेल्या दोन पेट्रोलियम गॅसच्या कॅरियर्सना सुरक्षित जाऊ दिलं आहे. याबाबतचं वृत्त रॉयटर्सनं संबंधित बाबीची थेट माहिती असलेल्या चार सूत्रांना हवाल्यानं दिलं आहे.
अमेरिकेचे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी भारतानं रशियाकडून पुन्हा तेल खरेदी करणे अत्यंत गरजेचं झालं आहे. त्यामुळं त्यांना ३० दिवसांची सवलत देण्यात आली आहे. मध्य पूर्व आशियातील संघर्षामुळं भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांना त्वरित तेलाचा पुरवठा होणं गरजेचं होतं. बेसंट यांनी रशियाकडून तेल खरेदी करणं गरजेच होतं कारण रशियन तेल आधीच ट्रांझीटमध्ये होतं.
ते पुढे म्हणाले, 'हे खूप गरजेचं होतं म्हणूच आम्ही ३० दिवसांची मुदत दिली. रशियाचे बॅरेल्सनी आधीच समुद्र प्रवास सुरू केला होता. त्यामुळं भारतीय तेलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी ते त्वरित पुरवठा करू शकत होते. जर दुसऱ्या बाजूनं विचार केला तर रशियाचे हे तेल असही चीनमध्ये गेलं असतं.