आंतरराष्ट्रीय

अपमानास्पद…इंडोनेशियातील हिंदू मंदिरात विदेशी नागरिकाचे नग्‍नावस्‍थेत ध्‍यान! संशयिताचा शोध सुरु

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडोनेशियातील बाली येथील एका हिंदू मंदिरात एका विदेशी व्‍यक्‍तीने नग्‍नावस्‍थेत ध्‍यान ( Meditated naked ) केल्‍याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकाराचा एक व्‍हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आरोपीने गळ्यात हार घालण्याशिवाय काहीही घातलेले नाही. तो मंदिरासमोर ध्यान करत बसल्‍याचे दिसत आहे.

बालीच्या लोकांच्या श्रद्धेचा अपमान …

बालीच्या महिला नागरिक नी लुह जेलांटिकने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खूप अपमानास्पद. आमच्या मंदिरात विवस्त्र होऊन ध्यान? बालीच्या लोकांचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अपमान करताना तुम्ही हे कसे करू शकता? इमिग्रेशन ऑफिसर, या व्‍यक्‍तीने आम्हा बालिनीमधील नागरिकांचा अपमान केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांनी परदेशी नागरिकाची ओळख पटवली आहे. मात्र, त्याचे नाव आणि राष्ट्रीयत्व उघड करण्यात आलेले नाही. त्याचा शोध सुरु आहे. व्हिडिओचे ठिकाण आणि व्हिडिओ कोणी काढला याचा खुलासाही झालेला नाही. इमिग्रेशन अधिकारी टेडी रियादी यांनी याप्रकरणी म्‍हटलं आहे की, "आम्ही बाली प्रादेशिक पोलिसांच्या गुप्तचर आणि सुरक्षा संचालनालयाच्या संपर्कात आहोत." आम्ही त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आहोत. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अलीकडील आकडेवारीनुसार, इंडोनेशियातील बाली बेटावर सर्वाधिक हिंदू राहतात. येथील ८३ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे.

हेही वाचा  :

SCROLL FOR NEXT