पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) चे मालक एलॉन मस्क यांच्याकडे थेट सार्वजनिक आवाहन केले आहे.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Imran Khan's ex-wife : ‘तुम्ही वचन दिले होते...’: इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी जेमिमा यांचे मस्क यांना पत्र

इम्रान खान यांना तुरुंगात मिळणार्‍या वागणुकीबद्दलच्या पोस्ट जाणीवपूर्वक दडपल्‍या जात असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

  • राजकीय कैदी म्‍हणून इम्रान खान यांना क्रूर एकांतवास

  • ‘एक्स’ हे व्यासपीठ स्वतःची प्रसार क्षमताच मर्यादित करत आहे

  • पोस्टला मिळणार्‍या इंप्रेशन्समध्‍ये कमालीची घट

Imran Khan's ex-wife Jemima letter to elon musk

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घटस्फोटित पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) चे मालक एलॉन मस्क यांच्याकडे थेट सार्वजनिक आवाहन केले आहे. इम्रान खान यांच्या अटकेबद्दल आणि तुरुंगातील वागणुकीबद्दलच्या त्यांच्या पोस्ट जाणीवपूर्वक दडपल्‍या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोठ्या संख्‍येने फॉलोअर्स असूनही खात्‍याची पोहोच कमी

पाकिस्‍तानमधील आदियाला तुरुंगात खान यांच्याशी गैरवर्तन होत आहे. त्यांना भेटण्यास बंदी असल्याचा आरोप खान कुटुंब सातत्याने करत आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा निषेध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले गेले आहे. याचवेळी जेमिमा यांनी यांनी एक्सच्याच ‘ग्रोक’ (Grok) या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनाच्या विश्लेषणाचा हवाला देत दावा केला आहे की, त्यांचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स असूनही, त्यांच्या खात्याची पोहोच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

‘राजकीय कैदी म्हणून इम्रान खान यांना क्रूर एकांतवासात’

मस्क यांना थेट संबोधित करताना गोल्डस्मिथ म्हणाल्या की, इम्रान खान यांना २०२२ मध्ये पदावरून हटवल्यानंतर, गेल्या २२ महिन्यांपासून राजकीय कैदी म्हणून क्रूर एकांतवासात ठेवण्यात आले आहे.या काळात त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या वडिलांना भेटता आलेले नाही, ते अनेक महिन्यांपासून त्यांच्याशी बोलू शकलेले नाहीत आणि त्यांना पत्र पाठवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून खान यांचे नावच अत्‍यंत प्रभावीपणे हटवले गेले आहे. त्यामुळे एक्स हेच "एकमेव स्वतंत्र व्यासपीठ" उरले आहे.

अल्गोरिथमिक दडपशाहीचा आरोप

पोस्टमध्ये, गोल्डस्मिथ यांनी आरोप केला की ‘एक्स’ हे व्यासपीठ स्वतःच आता त्यांची प्रसार क्षमताच मर्यादित करत आहे. त्यांनी ‘एक्स’च्या ग्रोक एआय टूलच्या निष्कर्षांचा हवाला देत दावा केला की, त्यांच्या खात्यावर छुप्या पद्धतीने घातलेली निर्बंध लादला गेला आहे. खान यांच्या तुरुंगातील परिस्थिती आणि त्यांच्या मुलांना त्यांना भेटण्याची परवानगी मिळण्यासंबंधीच्या पोस्ट अल्गोरिदमद्वारे लपवल्या जात आहेत.

तुम्ही भाषण स्वातंत्र्याचे वचन दिले होते

गोल्डस्मिथ यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, "तुम्ही भाषण स्वातंत्र्याचे वचन दिले होते, पण ते भाषण असूनही कोणाला ऐकू येत नाही," असे म्हणत त्यांनी मस्क यांना हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या खात्याची पोहोच पूर्ववत करण्याची विनंती केली आहे.

३५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असूनही...

गोल्डस्मिथ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या ३५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असूनही, ग्रोकच्या विश्लेषणात त्यांच्या प्रसारात नाट्यमय घट दिसून आली आहे.त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ आणि २०२४ च्या सुरुवातीस त्यांच्या पोस्टला दर महिन्याला सरासरी ४०० ते ९०० दशलक्ष (४० ते ९० कोटी) इंप्रेशन्स मिळत असत. आता २०२५ मध्ये त्यांचे एकूण इंप्रेशन्स केवळ २८.६ दशलक्ष (२ कोटी ८६ लाख) इतकेच आहेत. ही जवळजवळ ९७ टक्क्यांची घसरण आहे. मे २०२५ मध्‍ये पाकिस्तानमधील ‘एक्स’ (ट्विटर) वरील बंदी उठल्यानंतर त्यांच्या एका पोस्टला काही काळासाठी ४० लाख इंप्रेशन्स मिळाले होते; पण त्यानंतर त्‍याचा प्रसार "झटपट शून्याजवळ" कोसळला, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT