आंतरराष्ट्रीय

Shamima Begum : इसिसची बुरख्यातील बेगम थेट जिन्समध्ये आली कशी? 

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शमिमा बेगम (Shamima Begum) ही लंडनमधील एक शाळकरी मुलगी आहे, जी इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी पळून गेलेली होती. पण, आता तिने जनतेची अगदी तळमळीने माफी मागितलेली आहे. इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होणं हा माझा मुर्खपणा होता, असंही तिने सांगितलेलं आहे.

२०१५ मध्ये ब्रिटनमधील शमिमा बेगमसहीत अन्य दोन मुलींनी इस्लामिक स्टेसमध्ये सीरिया दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या होत्या. त्यामुळे ब्रिटिश नागरिकत्वही संपुष्टात आलेलं होतं. पण, सीरियाच्या अल रोज कॅम्पमधून ती सांगते की, "मला माहीत नव्हते की, इस्लामिक स्टेट ही 'डेथ कल्ट' आहे. तिथं शमिमा बेगमची भूमिका ही 'आई आणि बायको' इथंपर्यंतच मर्यादित आहे."

शमिमा बेगम म्हणते की, "सीरिया ही एक हिंसक संघटना आहे म्हणून मी सहभागी झालेले नव्हते. मला ही दहशतवादी संघटना डेथ कल्ट आहे, ही बाबच माहीत नव्हती. मला वाटलं की, तो मुस्लीम समाज आहे, त्यामुळेच मी त्यात सहभागी झाले. त्यावेळी मला इस्लामिक स्टेटकडून इंटरनेटद्वारे बरीच माहिती दिली जात होती."

सीरियामध्ये असताना ती बुरख्यामध्ये वावरणारी शमिमा बेगम आता टाॅप, जिन्स, कॅप परिधान करून आणि लिपस्टिक लावून मुलाखत दिली. शमिमा बेगम प्रसिद्धीसाठी असं करते आहे, अशा टीकेला तिने नाकारलं आहे.

शमिमा म्हणते की, "एक वर्ष झाले मी बुरखा घातलेला नाही. मी तो परिधान करणं सोडून दिलं. कारण, त्यात मी स्वतःला पाहत नव्हते. बुरख्यामध्ये मला खूपच संकोचल्यासारखं वाटत होतं." आता शमिमाचं ब्रिटनचं नागरिकत्व राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून काढून घेतलं आहे. ते परत मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, तिचं पुन्हा नागरिकत्व मिळण्याच्या प्रक्रियेला नाकारण्यात आलं आहे.

ब्रिटनच्या गृह सचिवांनी सांगितलं आहे की, "ब्रिटिश लोकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव तिच्यावर देशात बंदी घालण्यात आली आहे. त्यासंबंधी निर्णयदेखील घेण्यात आला आहे." शमिमाने इसिसच्या दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ले करण्यासाठी मदत केली, असा आरोप तिच्यावर झालेला होता. मात्र, तिने तो आरोप नाकारला आहे.

शमिमा म्हणते की, "इसिसमध्ये जाणून दहशतवादी कारवायांना दुजोरा देणारं कोणतंही कृत्य केलेलं नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्यांचा सामना करण्यास खंबीर आहे. त्यासाठी न्यायालयातही मी लढा देण्यास तयार आहे. कारण, मी इसिसमध्ये फक्त आई आणि पत्नीची भूमिका पार पाडत होती", असं मत शमिमाने गुड माॅर्निंग ब्रिटिन या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मांडलं आहे.

ती पुढे म्हणते की, "माझ्यावरील आरोप केले जातात. मात्र, त्याचा कोणताही पुरावा नाही. मला वाईट ठरविण्यासाठी हे आरोप केले जातात. पण, मी ब्रिटनच्या कोर्टात खटला चालवेन. न्यायालयाने दिलेली शिक्षा मी स्वीकारेन. पण, त्या इसिसच्या मृत्यूच्या दारात पुन्हा मरण्यासाठी जाणार नाही. त्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन."

समोर आलेल्या माहितीनुसार शमिमाने इसिसमधील एका डच सैनिकाशी लग्न केलं होतं. तिला तीन मुलेही झालेली होती. मात्र, तिची मुलं सीरियामध्ये मरण पावली. पण, २०१९ मध्ये मॅंचेस्टरमध्ये हल्ला झालेला होता, त्यावरील टिप्पणीसाठी तिने माफी मागितली आहे. तिने असंही म्हंटलेलं आहे की, एक वाईट व्यक्ती वाईट व्यक्तीला न्याय देऊ शकेल, यावर माझा विश्वास नाही.

"जेव्हा मला मॅंचेस्टरवरील हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा मला त्या घटनेविषयी काहीही माहीत नव्हते. त्या हल्ल्यात महिला आणि मुलांचा मृत्यू झाला, हेदेखील माहीत नव्हते. पण, मला माहीत आहे की, माझ्या माफीवर किंवा झालेल्या पश्चातापावर विश्वास ठेवणार नाहीत. पण, तरीही मी कळकळीने सांगते की, इथं आल्यावर नी कुणाला दुखावले असेल तर मी माफी मागते. मी दिलगिरी व्यक्त करते", असंही तिने मुलाखतीत सांगितलं आहे.

"मी कोणत्याही प्रकारे इसिसचे समर्थन करत नाही. त्याच्या विचारांशी मी सहमत नाही. त्यांनी ज्या दहशवादी कारवाया केल्या त्याच्याशीही मी सहमत नाही. धर्माच्या नावाखाली निरापराध लोकांना मारणं, न्यायाला धरून नाही", असंही शमिमाने मत मांडलं आहे.

तिला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांना तू काय सांगू शकते, असा प्रश्न विचारला असता शमिमाने सांगितलं की, "दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये मी त्यांना मदत करू शकते. कारण, इसिस आणि त्यांचा दहशतवादी कारवायांबद्दल त्यांना पुरेशी माहिती नाही. ती माहिती मी सांगू शकते."

इसिसमध्ये लोक कसे भरती होतात, त्यांना कोणतं अमिष दाखवलं जाते, त्यांना कसे प्रभावित केले जाते, ही सर्व महत्वाची माहिती ब्रिटनला दिली जाईल, अशी ऑफरही तिने दिली. पण, ब्रिटनचे गृहसचिव साजिद जावेद यांनी माध्यमांना सांगितलं की, "शमिमावरीला बंदीचा निर्णय लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय होता." पण, शमिमा ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नव्हती, या दाव्याला गृहसचिवांनी नाकारलं होतं.

साजिद जावेद पुढे म्हणतात की, "मी शमिमाच्या केसच्य़ा प्रकरणाच्या मुळाशी जाणार नाही.या प्रकरणात मी जे पाहिले आहे, ते तुम्ही पाहिलेले नाही. माझ्या जागी तुम्ही असता तर असाच निर्णय घेतला असता, यात काही शंका नाही." ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "राष्ट्रीय सुरक्षितता राखणे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवणे, हीच सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही वैयक्तिक प्रकरणांवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT