Houthi Missile Hits Israeli Airport
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज इस्त्रायलच्या विमानतळावर येमेनच्या हौथी बंडखोरांनी क्षेपनास्त्र हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. आता यावर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी एक व्हिडीओ शेअर करत बंडखोरांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. या व्हिडीओत ते म्हणाले की ‘आम्ही त्यांच्याबरोबर भुतकाळात ही आम्ही लढत होतो व भविष्यात ही आम्ही त्यांच्याबरोबर लढू’.
हौथी बंडखोरांनी इस्रायलची राजधानी तेल अवीव्ह येथील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मिसाईल हल्ला केला आहे. हौथी बंडखोरांना इराण समर्थन आहे. रविवारी (4 may) सकाळी बेन गुरियन विमानतळाजवळ मिसाईलचा स्फोट झाला. या स्फोटामुळे धुराचे ज्वालाचे लोट विमानमळ परिसरात पसरले होते. या प्रकारामुळे काही विमानतळावरील प्रवासी घाबरले होते. या घटनेमध्ये ८ प्रवासी जखमी झाल्याची सूत्रांची माहीती आहे. या घटनेमुळे काही काळासाठी विमानतळावरील उड्डाणे, रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबवण्यात आली होती.
गाझा व इस्त्रायलमध्ये दोन महिन्यांच्या युद्धविरामानंतर मार्चमध्ये पुन्हा गाझामधील लष्करी कारवाई सुरु आहे. या कारवाई तीव्र करण्याच्या विचारात इस्त्रायल आहे. त्याचेवळी हा हल्ला झाला आहे.
नेतन्याहू यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की त्यांचे मंत्रिमंडळ आज संध्याकाळी गाझा हल्ल्याच्या पुढील टप्प्यावर चर्चा करेल हमासचा संपूर्ण परावभ करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. आमची प्रमुख दोन उद्दीष्ट असतील यामध्ये आमच्या बंधकांना सोडवने व हमासला मात देणे. आमचा देश आता अंतिम युद्धासाठी तयार झाला आहे.
दरम्यान ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास-इस्त्रायल युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच इस्त्रायलवर अशा पद्धतीचा हल्ला झाला आहे. या हल्ल्याचे वैशिष्ठ्य म्हणजे येमेनच्या बंडखोरांनी इस्त्रायली मिसाईल डिफेन्स सिस्टिम नाकामी ठरवत थेट त्यांच्या विमानतळावर हल्ला केला आहे. इस्त्रायली संरक्षण दलांनी (IDF) सांगितले की, क्षेपणास्त्राचा अचूकपणे पत्ता लावण्यात आला, परंतु आयर्न डोम आणि अॅरो या संरक्षण प्रणाली ते मिसाइल अडवू शकल्या नाहीत.
सिनिअर इस्त्रायली पोलिस कंमांडर यांनी माध्यमांना क्षेपणास्त्रामुळे झालेले नुकसान दाखवले. पार्किंग तसेच,विमानतळाचा रस्ता याठिकाणी खड्डे पडले आहेत. या हल्ल्यामुळे इस्रायल-गाझा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.