

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या तणावातून इस्त्रायलने इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा शहर खान युनिसजवळ हल्ले सुरुच ठेवले आहेत, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. खान युनिसवर इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात सुमारे १८ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने सोमवारी दक्षिण गाझा शहर खान युनिसजवळ कारवाई सुरू ठेवली.
इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या झीटोन उपनगरात पाच जण तर इजिप्तच्या सीमेजवळील रफाह येथे दोन जण ठार झाले डॉक्टरांनी सांगितले. या हल्ल्यामुळे हमासने इजिप्त आणि कतार यांच्या मध्यस्थीने गुरुवारी होणाऱ्या नवीन युद्धाविरामचर्चेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामुळे हजारो पॅलेस्टिनींना खान युनिसमधून स्थलांतरीत व्हावे लागले आहे. दरम्यान, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमधील अनेक शहरांना लक्ष्य करून रॉकेट सोडले. गाझासाठी नवीन प्रस्तावांवर चर्चा करण्याऐवजी हमासने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मांडलेल्या युद्धविराम प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची योजना सादर करण्याची घोषणा केली आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार, 7 ऑक्टोबरपासून इस्रायलच्या हल्ल्यात किमान 39,897 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 92,152 लोक जखमी झाले आहेत. तर 7 ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यात इस्रायलमध्ये सुमारे 1,139 लोक मारले गेले आणि 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते.