किस्तानमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच. file photo.
आंतरराष्ट्रीय

Pakistan controversy |'पाकिस्तानमधील ८० टक्के लोक 'गे' आणि २० टक्के ...' : कराचीतील ट्रान्सजेंडर हिना बलोच यांचा खळबळजनक दावा

Pakistan controversy सामाजिक दबाव, धार्मिक बंधन आणि कौटुंबिक प्रतिष्ठेच्या संकल्पनांमुळे नागरिक ठेवतायत लैंगिकता लपवून

पुढारी वृत्तसेवा

Hina Baloch Pakistan 80 percent gay claim

कराची : "पाकिस्तानमधील ८० टक्के लोक 'गे' असून उर्वरित २० टक्के लोक 'बायसेक्शुअल' आहेत." सामाजिक दबाव, धार्मिक बंधने आणि कौटुंबिक प्रतिष्ठेच्या संकल्पनांमुळे पाकिस्तानातील नागरिकांना आपली लैंगिकता लपवून ठेवावी लागत आहे, असा खळबळजनक दावा पाकिस्तानमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हिना बलोच यांनी केला आहे. त्‍यांच्‍या व्हायरल व्हिडिओने सध्या पाकिस्‍तानात मोठा वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तानी समाजातील एक "ओपन सिक्रेट"

'क्विअर ग्लोबल'ला दिलेल्या मुलाखतीत हिना बलोच यांनी याला पाकिस्तानी समाजातील एक "ओपन सिक्रेट" असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या मते पाकिस्तानमधील निम्म्याहून अधिक लोक 'गे' आहेत. त्यांना हे उघडपणे सांगायचे नाही; पण मला वाटते की ८० टक्के पाकिस्तान 'गे' आणि २० टक्के 'बायसेक्शुअल' आहे. त्यामुळे, लैंगिकतेच्या बाबतीत पाकिस्तानात कोणीही पूर्णपणे 'स्ट्रेट' (विपरीतलिंगी) आहे असे मला वाटत नाही."

धार्मिक आणि सांस्कृतिक कारणांमुळे सत्य दडपले जाते

हिना बलोच यांनी दावा केला आहे की, अनेक लोक धार्मिक आणि सांस्कृतिक नियमांचा आधार घेऊन स्वतःच्या लैंगिक कल नाकारतात किंवा तो दाबून ठेवतात. स्वतःच्या अनुभवांबद्दल 'क्विअर ग्लोबल'ला दिलेल्या मुलाखतीत त्‍यांनी सांगितले की, त्यांच्या संघर्षाचे केंद्र हे लैंगिकतेपेक्षाही 'जेंडर एक्स्प्रेशन्स' (लिंगभाव व्यक्त करणे) अधिक होते. "मला चिंता होती ती लिपस्टिक कशी लावायची, जेणेकरून कुटुंबाचा मार खावा लागणार नाही. स्त्रीसुलभ कपडे कसे घालायचे, दागिने कसे परिधान करायचे आणि त्यासाठी मारहाण कशी टाळायची, हा माझा खरा संघर्ष होता."

पाकिस्‍तानात 'ट्रान्सजेंडर' समुदायाचे शोषण

पाकिस्तानमधील 'ख्वाजा सिरा' (ट्रान्सजेंडर) समुदायासमोर असलेल्या आव्हानांबाबत बोलताना अनेक व्यक्तींना भिक्षा मागणे, नाचणे किंवा देहविक्रय यांसारख्या शोषक व्यवसायांकडे ढकलले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या बंधनांना नाकारून, बलोच यांनी लिंग आणि अल्पसंख्याक हक्कांसाठी संघटित होण्यास सुरुवात केली आहे.

देश सोडून जाण्याची वेळ

हिना बलोच यांनी 'सिंध मूरत मार्च'ची सह-स्थापना केली आहे. त्या पाकिस्तानमधील 'औरत मार्च'मध्येही सहभागी झाल्या आहेत. त्यांनी ट्रान्सजेंडर आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांची बाजू वारंवार मांडली आहे. एका आंदोलनादरम्यान 'प्राइड फ्लॅग' फडकवल्यानंतर आपल्याला हिंसक प्रतिकाराचा सामना करावा लागला होता. सुरक्षा दलांकडून आपले अपहरण व छळ झाला होता, असा आरोपही बलोच यांनी केला आहे. या अनुभवांमुळे अखेर त्यांना देश सोडावा लागला. सध्या त्या लंडनच्या 'सोआस' (SOAS) विद्यापीठात शिष्यवृत्तीवर शिकत असून त्यांनी ब्रिटनमध्‍ये निर्वासित म्हणून आश्रय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT