Google AI Deep Minds Gemma cancer therapy :
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी ट्विट करून संभाव्य कॅन्सर थेअरपीबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे. त्यांनी गुगलचं डीप माईंड गॅमा AI मॉडेलनं कॅन्सरवरील उपचाराचा संभाव्य नवा मार्ग शोधून काढल्याचा दावा केला आहे. हे संशोधन गुगल आणि याले विद्यापीठानं संयुक्तरित्या केलं होतं. त्यातून नवीन संभाव्य कॅन्सर उपचार पद्धती निर्माण करण्यात आलं आहे.
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 'AI सायन्समध्ये एक उत्साहवर्धक माईलस्टोन गाठला गेला आहे. आमच्या यालेसोबत (विद्यापीठ) तयार केलेल्या C2S-Scale 27B या गॅमा बेस फाउंडेशन मॉडेलनं cancer cellular behavior बाबत एक संभाव्य नवीन उपचार पद्धती तयार केली आहे. जिवंत पेशींमध्ये शास्त्रज्ञांनी याबाबत प्रयोग करून ते प्रमाणित केलं आहे.'
ते पुढे म्हणातत, 'अधिक प्री क्लिनिकल आणि क्लिनिकल टेस्टनंतर हा शोध कॅन्सविरूद्ध लढण्यासाठी नवीन आणि अजून आश्वासक आणि मार्गदर्शक ठरेल.'
गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्या या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. गुगलचा माजी इंजिनिअर म्हणतो,
"AI चा सर्वात मोठा सामाजिक प्रभाव नेमका याच ठिकाणी आहे—ऑन्कोलॉजीसारख्या (कर्करोग विज्ञान) मूलभूत विज्ञानातील नवीन शोधांना गती देणे. केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन, C2S-Scale मॉडेल आणि येल विद्यापीठासोबतच्या सहकार्याने दर्शविल्याप्रमाणे, थेट सामाजिक हितासाठी मदत करणे हे अत्यंत प्रेरणादायक आहे. ही सिद्ध झालेली संकल्पना खऱ्या उपचारांमध्ये कशी बदलते हे पाहण्यास मी उत्सुक आहे!"
अजून एका ट्विटर युजरनं प्रतिक्रिया दिली की,
"स्पष्ट सांगायचे तर, हे विज्ञानासाठी AI च्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आपण ज्या सामान्य AI ला सरावलो आहोत, त्याऐवजी, हे मॉडेल विशेषतः पेशी आणि रेण्वीय जीवशास्त्रासाठी आहे. विज्ञानाच्या संदर्भात २७ अब्ज पॅरामीटर्स (27B params) खूप मोठे आहेत."@
तिसऱ्या युजरनं प्रतिक्रिया दिली
"अहो होय! तुम्ही मला वेडा म्हणा, पण कर्करोगाशी लढणे हे इतर फ्रंटियर लॅबमध्ये तयार होत असलेल्या निरुपयोगी गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचे आहे."
अजून एक युजर म्हणाला, "हे खूप खास आहे. माझे वडील कर्करोगाशी लढत असताना, मला वाटते की जलद उपचारांसाठी AI साधनांवर लक्ष केंद्रित करण्याची खूप गरज आहे. धन्यवाद Google."