Ex-FBI Director Murder threat to Trump Pudhari
आंतरराष्ट्रीय

Ex-FBI Director Murder threat to Trump: 'FBI'च्या माजी प्रमुखाची ट्रम्प यांना खूनाची धमकी? अमेरिकेच्या राजकारणात खळबळ; जाणून घ्या सविस्तर...

Ex-FBI Director Murder threat to Trump: जेम्स कोमी यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियातही खळबळ; ट्रम्प समर्थक भडकले, सुरक्षा अलर्ट मोडवर

Akshay Nirmale

Ex- FBI Director James Comey Murder threat to Trump

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतर्गत गुप्तचर संस्था एफबीआयचे माजी प्रमुख जेम्स कोमी एका गूढ सोशल मीडिया पोस्टमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ही पोस्ट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अप्रत्यक्ष "खूनाची धमकी" असल्याचा आरोप ट्रम्प समर्थकांनी केला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात तसेच सोशल मीडियात खळबळ माजली.

जेम्स यांनी पोस्टमध्ये काय म्हटले होते?

जेम्स कोमी यांनी इंस्टाग्रामवर समुद्रकिनाऱ्यावरील शंखांनी बनवलेली ‘8647’ आकृती शेअर केली होती. कॅप्शनमध्ये लिहिले होते – "Cool shell formation on my beach walk" (समुद्रकिनारी फेरफटक्यात शंखांची एक छान रचना सापडली).

दरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊन मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्यावर कोमी यांनी ती हटवली आहे.

काय आहे '8647' चा अर्थ?

"8647" या अंकाचा अर्थ ट्रम्प समर्थकांनी धोकादायक पद्धतीने घेतला आहे.

अमेरिकन स्लँगमध्ये 86 या आकड्याचा अर्थ कोणालातरी हटवणे किंवा मारून टाकणे असा होतो.

तर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यामुळे 47 हा अंक ट्रम्प यांचे प्रतिनिधित्व करतो.

म्हणून ‘8647’ = “ट्रम्प यांना हटवा किंवा मारून टाका” असा संदेश असल्याचा काहींचा दावा आहे.

कोमी यांची प्रतिक्रिया

वाद वाढल्यानंतर कोमी यांनी स्पष्टीकरण दिले की, "मी आज समुद्रकिनारी चालताना शंखांची एक रचना पाहिली आणि ती शेअर केली. मला कल्पनाही नव्हती की काही लोक या आकड्यांचा हिंसक अर्थ लावतील. मी कोणत्याही स्वरूपाच्या हिंसेचा विरोध करतो. त्यामुळे मी ती पोस्ट हटवली आहे."

ट्रम्प समर्थक आणि अधिकाऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी ही पोस्ट "माझ्या वडिलांच्या हत्येचे खुले आवाहन" असल्याचा आरोप केला आहे.

अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम यांनी म्हटले आहे की, "कोमी यांनी ट्रम्प यांची हत्या करण्याचे आवाहन केले आहे. आता या धमकीची चौकशी केली जाईल."

व्हाईट हाऊसचे उपमुख्य अधिकारी टेलर बुडोविच म्हणाले की, "ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे 'डीप स्टेट' घाबरली आहे. ही पोस्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षावरील ‘हिट’ संदेश होता."

डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स तुलसी गॅबर्ड यांनी याकडे गांभीर्याने पाहावे लागेल असे सांगितले. "या प्रकाराकडे दुर्लक्ष करू नका. ट्रम्प यांच्या विरोधात याआधीही दोन वेळा हत्येचा प्रयत्न झाला आहे," असे त्या म्हणाल्या.

पार्श्वभूमी

जुलै 2024 मध्ये ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनियामधील सभेदरम्यान हल्ला झाला होता आणि त्यांच्या कानाला गंभीर जखम झाली होती. रिपब्लिकन पक्षाकडून दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले ट्रम्प सभा घेत असताना हा हल्ला झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT